रोटरी क्लब ऑफ नासिक यांचे कडून ज़िल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप!

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक यांचे कडून सिन्नर बोरखिंड येथील ज़िल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले
रोटरी क्लब ऑफ नासिक यांच्या “जॉय ऑफ गिविंग”या उपक्रमा अंतर्गत सिन्नर बोरखिंड येथील ज़िल्हा परिषद शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले

.रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा रोटे डॉ श्रेया कुलकर्णी , रोटे डॉ रचना चिंधडे ,रोटे निलेश अग्रवाल ,रोटे निलेश सोनजे ,रोटे नितीन ब्रह्मा , रोटे कमलाकर टाक यांच्या उपस्तीथी मध्ये हा कार्यक्रम सिन्नर बोरखिंड येथील ज़िल्हा परिषद शाळे मध्ये पार पडला .
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हात स्वछ कसे धुवावेत ह्याचे प्रात्यक्षिक दाखविले , रोटे डॉ रचना चिंधडे यांनी दातांची निगा कशी राखावी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना साबण , वह्या ( फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल मधील इंटरॅक्ट क्लब चे सहकार्य ) , टूथ ब्रश , टूथ पेस्ट , सकस आहार चे काही पॅकेट्स , उबदार कपडे , पाय पुसण्या साठी चटई , हात स्वछ कसे धुवावे यावरील पॅम्प्लेट्स , तसेच स्वेटर वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ नासिक च्या या दातृत्वाने विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रोटरी क्लब ऑफ नासिक चे आभार मानले. रोटरी क्लब ऑफ नासिक मधील दानशूर रोटेरिअन्सने सढळ हाताने केलेल्या आर्थिक मदतीमुळेच या गरजू विद्यार्थ्यांना त्यांना हवी असलेल्या वस्तूचे वाटप करणे शक्य झाले या साठी क्लब च्या अध्यक्षा रोटे डॉ श्रीया कुलकर्णी यांनी रोटेरिअन्सचे आभार मानले. जॉय ऑफ गिविंग हा उपक्रम अनेक महिन्या पासून राबविला जात असून ह्यास रोटेरिअन्स आणि नाशिक मधील नागरिकाचा सुद्धा छान प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी सांगितले.