;आजचे पंचांग व राशिभविष्य दि ८/४/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १८ शके १९४४
दिनांक = ०८/०४/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.
वृषभ
फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडीवर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.
मिथुन
चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
कर्क
भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
कन्या
भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
तूळ
घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.
वृश्चिक
तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.
धनू
हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.
मकर
नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.
कुंभ
कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
मीन
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १८ शके १९४४
दिनांक :- ०८/०४/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति २३:०६,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २५:४३,
योग :- शोभन समाप्ति १०:२९,
करण :- गरज समाप्ति ०९:५०,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- बुध – मेष ११:५९,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५८ ते १२:३१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:२५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२५ ते १०:५८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०२:०४ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
अशोक कलिका प्रशअन २५:४३ नं., सूर्याला दवणा वाहणे, दग्ध २३:०६ नं., भद्रा २३:०६ नं.,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर