योग्य ठिकाणी पेरलेले सत्कर्माचे बीज मोठे फळ देते-आ.बापुसाहेब पठारे
.
अकोले/प्रतिनिधी-
संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही.प्रयत्न छोटे असले तरीही चालतील पण त्यात सातत्य असले पाहिजे.त्यासाठी सत्कर्म केले पाहीजे.कारण योग्य ठिकाणी पेरलेले सत्कर्माचे बीज मोठे फळ देते.असा अशावाद आमदार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.
अगस्ति रुरल एज्युकेशन सोसायटीचे महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय पिंपळगाव नाकविंदा यांचे वतीने बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन समारंभ संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला.याप्रसंगी आमदार पठारे विचारमंच्यावरून बोलत होते.
यावेळी महादेवराव पठारे,ज्ञानेशानंद महाराज शास्त्री,एकनाथराव पठारे,बबनराव पठारे,रतनाकांत भुजबळ,मंगेश नवले,सुरेशराव शिंदे,अर्जुनराव पठारे,बबन आभाळे,विनोद हांडे,विजय पोखरकर,प्रमोद मंडलिक,भाऊसाहेब कासार,बाळासाहेब कासार,पुंजा कासार,विजय गायकवाड,गणपत आभाळे,गोरख आभाळे,रामनाथ कासार,सुभाष बोऱ्हाडे,नामदेव काळे यांसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
आमदार बापुसाहेब पठारे यांनी पुढे मार्गदर्शन करताना प्रत्येक व्यक्तीने मनामध्ये जिद्ध ठेवावी. जिवनात दान करणे महत्त्वाचे असून आपण स्वतःपेक्षा समाजासाठी काय करतो हे महत्वाचे असते.माणसाने चांगल्या कामासाठी खोट बोलाव मात्र सुंदर आयुष्यासाठी खोटे बोलू नये.असे विचार व्यक्त करत मोठे होत असताना आई वडीलांना विसरू नका,जिवनाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचे कार्य अभ्यासा.असे अव्हान केले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे ॲड.वसंतराव मनकर यांनी आपले पठारे कुटुंब दानशूर असून.स्वतःला अनेक दुःखात असताना इतरांना सुखी ठेवतात.त्यांच्या परिसरात सर्व कार्यक्रमांचे नियोजन व मदतीचा हात पठारे कुटुंबाचा असतो. समाजासाठी उभ्या राहणाऱ्या धार्मिक व्यक्तीचा गौरव करत. मी बहुउद्देशीय सभागृहाचे लवकरच उद्घाटन करण्याचा संकल्प केला. तो पुर्णत्वास जातोय याचा आनंद व्यक्त करत शहरांपेक्षा खेडयातील शाळा सुरक्षित असून व्यावसाय आभ्यासक्रम मुलांना स्वतंत्रपणे शिकवता येत असल्याचे गौरोद्गार व्यक्त केले. महादेवराव पठारे यांनी शहरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा निसर्गाच्या सानिध्यातली आपली शाळा निश्चितच चांगली आहे.ग्रामीण भागातील शाळा सुरक्षित आहे.विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन सुविधा या सभागृहातून मिळावी.क्रीडा मार्गदर्शन केंद्रातून अनेक विदयार्थी अधिकारी वर्गापर्यंत पोहचले.म्हणून मोबाईलचा वापर कमी करून लेखन,वाचन वाढवा.आपल्या जिवनात स्वतःची प्रकृती ठीक ठेवा.मेहनत करणाऱ्याला नशिब साथ देते म्हणूनच चांगले शिक्षण घेऊन स्वतःचे,कुटुंबियाचे,गावाचे,परिसराचे,शाळेचे नाव तुम्ही उंचवावे ही अपेक्षा व्यक्त केली. ज्ञानेशानंद महाराज शास्त्री यांनी संघर्ष नावाच्या वृक्षावर यशाची फुले उमलत असतात.म्हणून जिवनात मानसिकता सकारात्मक ठेवा.आमदार बापूसाहेब पठारे हे लोकनेते आहे. मनकर साहेबांचे कार्य महान आहे.मनकर साहेबांच्या मनात येईल ते साकार होईल.बापुसाहेब पठारे पुन्हा आमदार होतील.सभागृहाचे काम सहा महिन्यात पुर्ण होईल.सभागृहाचे उद्घाटन आमदार पठारे यांचे हस्ते होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंगेश नवले,प्रमोद मंडलिक,बबनराव आभाळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी विदयालयाचा आत्तापर्यंतचा उंचावलेल्या आलेखाचा लेखाजोखा मांडला.सुत्रसंचालन रामदास कासार यांनी केले.तर विजयकुमार भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.