डॉ. आयेशा इम्रान सय्यद यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इंग्रजी साहित्यात पीएच.डी. प्रदान

अकोले प्रतिनिधी
: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित institute of Advanced Studies in English, औंध पुणे, येथुन संशोधक डॉ. आयेशा इम्रान सय्यद यांनी इंग्रजी भाषा आणि साहित्यात (English Language and Literature) पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. “स्पीच अॅक्ट्स इन द सिलेक्टेड नॉव्हल्स ऑफ टोनी मॉरिसन” या विषयावर सखोल संशोधन करणारे प्रबंध त्यांनी सदर केले.
डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ. आयेशा यांनी आपला प्रबंध यशस्वीरीत्या सादर केला.
डॉ. आयेशा यांनी या यशाबद्दल आपल्या आई-वडिल- डॉ. इम्रान व डॉ. महेजबीन, पती रेहान नवाब, कन्या जारा तसेच कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे आभार मानले. तसेच डॉ. अशोक थोरात, डॉ. संजय पगारे, डॉ. अशोक चासकर आणि डॉ. मेहबूब तांबोळी यांचे मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार व्यक्त केले.
त्यांचे हे यश इंग्रजी साहित्यक्षेत्रात एक नवी भर घालणारे असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वैभवामध्ये भर घालणारे आहे असे परिक्षक डॉ. निवृत्ती पवार यांनी प्रतिपादन केले.