इतर
Trending

सोनई त विजेच्या शॉक लागून दोघा मायलेकींचा करूण अंत!

नेवासा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथे विजेच्या तारेचा शॉक लागून दोघा मायलेकींचा करूण अंत झाला सोनईत बालाजी नगर परिसरात निर्मला रमेश कुसळकर (वय 42), निकिता अमोल ननवरे (वय 22), या धुतलेले कपडे वाळत घालत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून या दोघींचा एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला
.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना शिंगणापूर रोडवर स्टेट बँके जवळ टेलिफोन वायरचे काम करत असताना बाळासाहेब त्रिंबक खोसे (वय 42) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

वेगवगळ्या घटनांमध्ये बुधवारी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात विजेच्या तारेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला तर . एका युवतीने आत्महत्या केल्याने तर. एका महिलेने विष प्राशन केल्याने उपचारापूर्वीचा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button