खरवंडी कासार येथे कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबीर सम्पन्न!

अशोक आव्हड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे देवनाथ फाउंडेशन च्या वतीने कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबिर झाले
देवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मोहटादेवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती गट विकास अधिकारी शितल खिंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भाग हा ऊस तोडणी कामगाराचा पट्टा असून लहान मुलांचे संगोपन व्यवस्थित रित्या होत नाही त्यामुळे ही मुले कुपोषित व अशक्त राहतात याचा विचार करून डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांनी कुपोषित बाळासाठी या शिबिराचे आयोजन केले
डॉ.विनोद गजेऺ यांनी बालकांची विशेष तपासणी करून गरजूंना पुणे, मुंबई येथे सवलतीमध्ये उपचारासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
डॉ.दराडे यांनी मागील दोन वर्षांमध्ये करोना काळामध्ये अहमदनगर येथील क्रिस्टल हॉस्पिटल या ठिकाणी करोणा काळातील रुग्णांची सेवा केली आणि आपली माय भूमी खरवंडी कासार याठिकाणी देवनाथ हॉस्पिटल पुन्हा एकदा पूर्ववत चालू केले आहे त्यांनी मागील आठवड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरवंडी कासार या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व शालेय साहित्य वाटप केले
भगवान गड परिसरातील शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी देवनाथ हॉस्पिटल कडून पूर्णपणे मोफत करण्यात येईल व यापुढे असेच वेगवेगळे उपक्रम घेऊन वंचितांना व गोरगरीब जनतेला या उपक्रमातून निश्चितच लाभ मिळेल असे यावेळी त्यांनी सांगितले.
या शिबिरासाठी बालविकास अधिकारी महेंद्र दराडे, प्रा. आरोग्य केंद्र अधिकारी डॉ ऋषाली दराडे, डॉ.मोनिका आघाव, बाल रोग तज्ञ डॉ. विनोद गजेऺ, डॉ. श्रीधर देशमुख कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर दौंड, श्री भगवान प्रतिष्ठानचे संजय फुंदे ,सरपंच आजिनाथ दराडे , सुनील खेडकर सर, विनोद घुले, महादेव जगताप, दिलीप जवरे , अशोक बांगर , मुकुंद दगडे, अनिल जवरे, पांडुरंग जगताप आदी मान्यवर या शिबिरास उपस्थित होते