इतर
ब्राह्मण समाजाला संपवून टाकू असे अपशब्द वापरून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्यावर कारवाई करा

उरण दि 2
— ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असे यु ट्यूब चॅनल वर बेताल वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडण्यास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करुन निषेध नोंदवला
या मागणीसाठी आज शनिवारी दिनांक 2/3/2024 रोजी उरण ब्राह्मण समाजबांधवांचे वतीने उरण पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार उरण यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ब्राह्मण सभा उरणचे ट्रस्टी श्री विराम उपाध्ये, उपाध्यक्ष अनिल दाते, खजिनदार हेमंत धामणकर, सचिव वैभव राईलकर, कार्यकारिणी सदस्य धनंजय उपाध्ये तसेच महिला मंडळ कार्यकारिणी सदस्य श्रीमती नंदीनी राईलकर, श्रीमती मृणाल उपाध्ये, श्रीमती नेहा उपाध्ये, सौ देशमुख तसेच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.
