एकाच कुटुंबातील तिघा भावंडांनी मिळविले स्पर्धा परीक्षेत यश !

तिघांची शासकीय सेवेत निवड
कोतुळ /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील अशोक शेळके व सौ. शांता अशोक शेळके यांची तिन्ही मुलांनी क्रमाक्रमाने विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने परिसरात आनंदाबरोबर कुतूहल व्यक्त होत आहे.
अत्यंत खडतर व बिकट परिस्थितीतून मार्ग काढत या तिघांनीही आपला यशाचा मार्ग मोकळा केला,
प्रथम शिवा अशोक शेळके, यांनी एम. पी. एस. सी. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मधून मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी हे पद मिळविले, ही परीक्षा त्यांनी 2021/22मध्ये दिली होती, त्या नंतरच्या 2022/23 एम.पी.एस.सी.च्या दुसऱ्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन त्यांनी क्लासवन हे पद मिळविले,हे दोन्ही निकाल 15 दिवसाच्या अंतराने घोषित झाले,
त्यानंतर सौ.भारती अशोक शेळके, व कु.पुजा अशोक शेळके या दोघींनीही सरळ सेवा स्पर्धा परीक्षेचे आरोग्य विभागाचे 2023 चे पेपर दिले होते, या परीक्षेत त्या दोघी नुकत्याच उत्तीर्ण झाल्या असून, आता या तीनही भावंडांची शासकीय सेवेत निवड झाली.
वडील पेंटर व आई विडी कामगार असूनही अत्यंत कठीण परिस्थितीतून या तिघांनी आपली जिद्द कायम ठेवत नवीन पिढीपुढे एक आदर्श समोर ठेवला, परिस्थिती ला आव्हान देत त्यांचा मार्ग त्यांनी सुखद केला,,
“कुछ किये बिना जयजयकार नहीं होती, कोशीष करनेवालोकीं कभी हार नहीं होती, “
हे वाक्य त्यांनी सत्यात उतरवून दाखविले.
त्यांचे हे अभूतपूर्व यश आजच्या तरुण विद्यार्थ्यांना निश्चितच दिशादर्शक ठरणारे आहे.
त्यांच्या या निवडीचे त्यांचे आजोबा सोमदास पवार, चुलते एकनाथ (नाथा) शेळके, कोतुळचे सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच, संजय देशमुख ,संजय लोखंडे ,गणेश पोखरकर,रवी आरोटे,नामदेव देशमुख, भाउदाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि देशमुख ग्राम सदस्य बबलू देशमुख , सुनील गीते,अकोले येथील रेणूकादास, विश्वासराव आरोटे, हेमंत आवारी,व कोतुळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुढील वाटचालीस तिघांनाही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
——–