शैक्षणिक संकुल मवेशी येथे आदिवासी गौरव वर्षा निमित्त,धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबीर संम्पन्न

अकोले प्रतिनिधी
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर अंतर्गत शैक्षणिक संकुल मवेशी येथे सोमवारी आदिवासी गौरव वर्ष निमित्त, धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबीर 2025 तसेच शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला.
आधार कार्ड, पी एम किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, जातीचे दाखले, पी एम गरीब कल्याण योजना, पी एम मातृवंदना योजना, पी एम उज्वल योजना, पी एम जनधन योजना, आयुष्यमान भारत, पी एम जन्म आरोग्य योजना, जनधन बँक खाते, रेशन बँक खाते, रेशन कार्ड, घरकुल, वीज कनेक्शन, सौर पंप, या कार्यालय अंतर्गत सन 2025- 26 मध्ये राबविण्यात येणाऱ्या न्यूक्लिअस बजेट योजना, या अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यात आले.तसेच उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले.

या प्रसंगी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आदिवासी विकास विभाग मंत्रालय अवर सचिव श्री. उदयजी गवस, राजूर चे प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे ,कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी श्री. अमर माने,नायब तहसीलदार अकोले .श्री.प्रमोद सावंत, गट शिक्षण अधिकारी श्री. अरविंद कुमावत, पुरवठा अधिकारी,पंचायत समिती नायब तहसीलदार, प्रकल्प कार्यालयाचे सर्व मान्यवर, गावचे सरपंच .श्री. यमाजी भांगरे, संकुलातील सर्व आस्थापनांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व मुख्याध्यापक अधीक्षक, अधिक्षिका, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी,ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
