सोलापुरातील विवान, विहान, श्रेया, हिमांशू, आयुष, ओमला मिळाले फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन

सोलापूर – सोलापुरात गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या चेस इन स्कूल च्या प्रशिक्षिका आणि पी आर चेस वर्ल्ड च्या संस्थापिका राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा मॅडम यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.
हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून अव्वल स्थान पटकवीत आहेत. ह्या अकॅडमी मध्ये ऑफलाइन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.
ऑनलाईन मध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, दुबई, इंग्लंड व श्रीलंका या देशातही प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. सोलापुरातील विवान दासरी, विहान कोंगारी, श्रेया संदूपटला, हिमांशू व्हनगवडे, आयुष गायकवाड आणि ओम निरंजन यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जलदगती व अति जलदगती प्रकारात आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे.
के एल ई स्कूल मध्ये शिकत असलेला विवान दासरी ह्याने पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्का देत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १५८० फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
श्री सिद्धेश्वर स्कूल मध्ये शिकत असलेल्या विहान कोंगारी ह्याने पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्के देत जलदगती आणि अति जलदगती अशा बुद्धिबळाच्या दोन्ही प्रकारात अनुक्रमे १४७० व १४२१ फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
ज्ञान प्रबोधिनी स्कूल मध्ये शिकत असलेली श्रेया संदूपटला हिने सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना नमवीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १४९० फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
सेंट जोसेफ स्कूल मध्ये शिकत असलेला हिमांशू व्हनगवडे ह्याने सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा पराभव करीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १४३४ फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
एल एफ सी स्कूल मध्ये शिकत असलेले आयुष गायकवाड आणि ओम निरंजन ह्यांनी पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त विरोधी खेळाडूंना पराभवाचा धक्के देत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे १४५१ व १४०३ फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
विवान, विहान, श्रेया, हिमांशू, आयुष आणि ओम यांना आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी सर, राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका रोहिणी तुम्मा मॅडम आणि राज्य पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका जयश्री कोंडा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन, त्यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि पालक यांनी मुलांच्या बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले.



