इतर

मकर संक्रांत अशुभ आहे ही अफवा!


मकर संक्रांत व भोगी खुलासा

भोगी आणि एकादशी
यावर्षी दि 13 जानेवारी ला गुरुवारी भोगी सण असून त्याच दिवशी एकादशी पण आहे . भोगी चा सण करताना वाण- वसा करता येतो मात्र ज्यांना एकादशी चा उपवास आहे त्यानी उपवसास चालणारे पदार्थ खावेत त्यामध्ये तिळगूळ खाता येतो आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी भोगीचे पदार्थ खावेत ।
🌹मोहन दाते पंचांगकर्ते 🌹

मकर संक्रांति फल

शके १९४३ प्लवनाम संवत्सर , उत्तरायण , हेमंतऋतु ,पौष शुक्ल द्वादशी शुक्रवारी रोहिणी नक्षत्रावर ब्रम्हा योगावर कौलव करणावर दुपारी२:२९  मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे .संक्रांतीचा पुण्यकाल शुक्रवारी १४ जानेवारी २०२२ दुपारी २:२९ पासून सायंकाळी  सुर्यास्तापर्यंत  आहे . या पुण्य काळामध्ये धार्मिक कृत्य दान धर्म इत्यादी करावीत.

बालव करणावर संक्रांत होत असल्याने या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे . या संक्रांतिने पिवळे वस्त्र परिधाण केले आहे . हातात गदा घेतलेली आहे . केशराचा टिळा लावला आहे . वयाने कुमारी असून बसलेली आहे . वासाकरीता जाईचे फूल घेतलेले आहे . पायस भक्षण करीत आहे . व मोती अलंकार धारण केले आहे . संक्रांति जातीने सर्प आहे . तिचे वार नाव मिश्रा असून नाक्षत्रनाव नंदा असून  सामुदाय मुहूर्त ४५ आहेत

ही संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे . संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पिडा अशी फले प्राप्त होतात .*
*संक्रांति पर्वकाळात स्नान , दान धर्म आदी पुण्य कृत्य केले असता त्याचे फल शतगुणित होते . या पर्वकाळात जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात व जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होते

संक्रांतीच्या पर्वकाळात वर्ज्य कर्मे :- दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हैशींची धार काढणे व काम विषयक सेवन करणे ई. कर्मे करू नयेत

सक्रांतीपर्व काळात करावयाची दाने

नवे भांडे , गाईला घास , अन्न , तिळपात्र , वस्त्र, तीळ, गुळ, गाय , सोने ,  भूमी,  नारळ इत्यादी यथाशक्ती  दान द्यावे .

या दिवसाचे कर्तव्य :-

तिल मिश्रित उदकाने स्नान,  तिळाचे उटणे अंगात लावणे ,  तिल होम , तिलतर्पण , तिल  भक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.

दान संकल्प

देशकाल कथन करून
मम आत्मन: सकल पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धी दीर्घायु: महेश्वर्य  मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोक्तफल सिद्धये अस्मिन् मकर संक्रमण पुण्य काले ब्राह्मणाय ( अमुक ) दानं करिष्ये
असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी .

🕉️जन्मनक्षत्रा वरून संक्रांतीची शुभाशुभ फले🕉️

🕉️ कृतिका , रोहिनी , मृग :- प्रवास .

🕉️ आर्द्रा , पुनर्वसु  , पुष्य ,  आश्लेषा , मघा , पूर्वा :- सुख , सौख्य .

🕉️ उत्तरा , हस्त  , चित्रा :- रोग – आजार .

🕉️ *स्वाती , विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ ,  पूर्वाषाढा :- वस्त्र लाभ .*

🕉️ उत्तराषाढा , श्रवण , धनिष्ठा :-  नुकसान .

🕉️ शततारका , पूर्वाभाद्रपदा ,  उत्तराभाद्रपदा , रेवती , अश्विनी , भरणी :- उत्तम द्रव्य लाभ .

दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये .(संदर्भ :- दाते पंचांग )

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
📞 8411935533
      9561947533

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button