राजापूर महाविद्यालयात सायन्स विभागाचा विद्यार्थी – पालक मेळावा संपन्न !!

संगमनेर- प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी विज्ञान शाखा विद्यार्थी – पालक मेळावा सम्पन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रागतिक शिक्षण संस्थेचे संचालक ॲड.गायकर साहेब यांनी स्वीकारले तसेच याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रामनाथ पुंजाजी हासे साहेब हे देखील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शाखेचे प्रमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष वर्पे यांनी केले. पालकच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत असे त्यांनी प्रास्ताविकामध्ये प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.सुभाष कडलग सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . महाविद्यालयाच्या केलेल्या विकासाबद्दल पालकांशी संवाद साधला तसेच विद्यार्थी आणि पालक यांच्या अडचणी विचारून महाविद्यालय त्या अडचणी सोडवण्यास मदत करेल असे आश्वासन दिले.
नॅक बाबत मार्गदर्शन केले.उपस्थित पालक श्री.संजय गोफणे तसेच श्री.अण्णासाहेब रहाणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आणि प्राचार्यांना आपल्या पाल्यांच्या जबाबदारीचे आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी वेळोवेळी उपस्थित राहून मदत करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कु.निकिता राहणे आणि कु.अनुजा घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य गोफणे सर यांनी देखील महाविद्यालयातील नॅक च्या कामकाजाचा थोडक्यात आढावा पालकांसमोर सादर केला .कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मनोगतात ही संस्था विद्यार्थी कल्याणसाठी कशी झटत असते हे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शितल वाळुंज आणि प्रा.अर्चना साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक वैभव गडाख यांनी केले.