आजचे पंचांग व राशिभविष्य दि १३/०१/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २३ शके १९४३
दिनांक :- १३/०१/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:११,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १९:३३,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १७:०७,
योग :- शुभ समाप्ति १२:३४,
करण :- बव समाप्ति –:–,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- धनु – उत्तराषाढा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- रात्री २०नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०१ ते ०३:२४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:०५ ते ०८:२९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३८ ते ०२:०१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०१ ते ०३:२४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:४७ ते ०६:११ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
पुत्रदा एकादशी, धनुर्मास समाप्ति, भोगी, मन्वादि, घबाड १९:३३ नं., भद्रा १९:३३ प., यमघंट १७:०७ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २३ शके १९४३
दिनांक = १३/०१/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
दिवसाची सुरुवात चांगली होईल, तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल. सामाजिक ठिकाणी बोलण्याच्या प्रभाव वाढ होईल तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री देखील होऊ शकते. अध्यात्मिक कामांमध्ये आवड असेल. त्यातून लाभ मिळेल. घरातील लोकांशी ताळमेळ साधला जाईल. आवश्यक तो पाठींबा देखील कुटुंबाकडून मिळू शकतो. तब्येतीत सुधारणा होऊ शकते.
वृषभ
व्यक्तित्वात आकर्षकता असेल. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. संध्याकाळचा वेळ निश्चिंत घालवता येईल. मोठ्या समस्येतून सुटका होईल. वडील आजारी असतील तर त्यांची तब्येत सुधारेल. या राशीच्या काही लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परदेशी व्यापारातून लाभ होईल.
मिथुन
आज संध्याकाळी अचानक खर्चात वाढ होईल. परदेशातून लाभ संभवतो. देण्या-घेण्यात सावधान रहा. डोळ्यांत जळजळ होऊ शकते म्हणून धुळीच्या ठिकाणी जाऊ नका. व्यावसायिकांना कामासंदर्भात प्रवास करावा लागेल. अध्यात्मिक विषयात आवड वाढेल.
कर्क
सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. भावंडांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रात चांगले बदल घडून येतील. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. चंद्र आज तुमच्या लाभ स्थानी असल्याने काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतूनही फायदा होईल.
सिंह
कार्यक्षेत्रात सहकारमय वातावरण निर्माण कराल. ताटकळत असलेले एखादे काम मार्गी लागेल. वडिलोपार्जित व्यवसायात प्रगती होईल. प्रेम जीवनात रोमांस कायम राहील. बेरोजगारांना आज रोजगार मिळू शकतो. वडिलांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे.
कन्या
आज भावनिक असून लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असाल. वडील व वडिलांसमान लोकांकडून लाभ होऊ शकतो. नशिबाच्या साथीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ लोकांच्या सल्याने कामे होतील. रात्रीच्या वेळी जोडीदारासोबत भविष्य योजना तयार करू शकता.
तूळ
तब्येत सामान्य असेल. अनावश्यक विचारांमुळे मानसिक अस्वस्थता वाटू शकते. या राशीच्या काही लोकांना अनोळखी लोकांकडून लाभ होईल. या राशीचे लोकं आई-बहिणींसमोर आपले मन मोकळे करू शकतात. आज स्वतःच्या तब्येतीबरोबर आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
वृश्चिक
दिवसाची सुरुवात आळसवाणी होईल. करियरमध्ये दिवस उत्साहाचा असेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभ होईल. जोडीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. व्यावसायिकांना एखाद्या नातेवाईकांकडून फायदा होऊ शकतो.
धनु
खोटी स्तुती करणाऱ्या लोकांपासून सावध रहा आणि वास्तविकतेचे भान ठेवा. सामाजिक स्तरावर बोलण्यापेक्षा दुसऱ्यांचे ऐकण्यावर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल. अनावश्यक काळजी मनात घर करतील. योग-ध्यानाने लाभ होईल. आज तुमचे विरोधक सक्रिय असतील आणि तुमच्या विरोधात कट करू शकतात. त्यामुळे सावध राहा.
मकर
प्रेम जीवनात सहकार्य आणि प्रेमात वृद्धी होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा होईल. नशिबाची साथ मिळेल. साहस व धैयाने काम सुद्धा पूर्ण होईल प्रयत्न केला पाहिजी. जुन्या अनुभवांनी आज लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले अनुभव येतील.
कुंभ
आईसमोर मनातील गोष्ट मांडू शकतात. कौटुंबिक जीवनात या राशीचे लोकं कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात. बऱ्याच काळापासून वाहन खरेदी करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात आजचा दिवस प्रगतीचा असेल. साहस कामांमध्ये आवड वाढेल.
मीन
साहस-पराक्रमात वाढ होईल. आज न घाबरता कोणासमोरही स्वतःचे म्हणणे मांडू शकाल. करीयरमधील सक्रियतेने अपेक्षित परिणाम साध्य होतील. लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आईच्या सेवेने आनंद मिळेल, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. सरकारी कामात काम करत असल्यास आज चांगली बातमी मिळू शकते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर