राशिभविष्य

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१५/०१/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏

🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २५ शके १९४७
दिनांक :- १५/०१/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१२,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २०:१७,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति २९:४८,
योग :- वृध्दि समाप्ति २०:३८,
करण :- गरज समाप्ति –:–,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- मंगळ – मकर २८:२७,
शुभाशुभ दिवस:- करिदिन वर्ज्य दिवस,


✿राहूकाळ:- दुपारी ०२:०२ ते ०३:२५ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहुर्त — सकाळी ०७:०६ ते ०८:२९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३९ ते ०२:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:२५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:४९ ते ०६:१२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
करिदिन,
————–

🌏🌏 राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २५ शके १९४७
दिनांक = १५/०१/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वारंवार मानसिक बदल होतील. कष्टाचे चीज होईल. कौतुकास पात्र व्हाल.

वृषभ
स्त्रीवर्गाच्या मदतीने कामे होतील. अपेक्षित लाभ हाती येईल. तुमचा सन्मान केला जाईल. धार्मिक कामातील सहभागातून समाधान लाभेल. जमिनीची कामे होतील.

मिथुन
वैवाहिक सौख्य द्विगुणीत होईल. पत्नीला चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलून कामे कराल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. व्यावसायिक लाभाचा दिवस.

कर्क
दिवस सौख्यकारक असेल. चैनीवर भर द्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. विचारांना योग्यवेळी आवर घालावी.

सिंह
क्रोधावर नियंत्रण ठेवावे. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. संयम बाळगावा लागेल. क्षणिक सौख्याच्या मागे लागू नका. हातातील कामात विशेष लक्ष घालावे.

कन्या
जोडीदाराच्या सहवासात रमाल. जवळच्या मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. ऐषारामाच्या वस्तूंची खरेदी कराल. तुमचा नावलौकिक वाढेल.

तूळ
मित्रमंडळींशी सलोखा वाढवावा. अडचणीतून मार्ग काढाल. तुमच्या कामावर सगळे खुश असतील. आर्थिक मान सुधारेल. कामे अपेक्षेनुसार पार पडतील.

वृश्चिक
नोकरदारांचा ताण वाढू शकतो. थोरांशी मतभेद टाळावेत. सरकारी कामात विलंब संभवतो. कामाला अपेक्षित गती येईल. जवळचा प्रवास चांगला होईल.

धनू
कौटुंबिक वातावरणात रमून जाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. आवडीचे पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. घरगुती कामाच्या वस्तू खरेदी कराल.

मकर
पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकांतील जवळीक वाढेल.

कुंभ
काही गोष्टी जुळवून घ्याव्यात. स्वाभाविक विरोध दर्शवू नये. खर्चाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कामात लक्ष घालाल. महत्त्वकांक्षा बाळगाल.

मीन
जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे. तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. जवळचे मित्र भेटतील. स्त्रीसमुहात वावराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button