इतर

केरळच्या धर्तीवर पत्रकारांना घरे व पेन्शन मिळवून देण्यासाठी सीनिअर जर्नालिस्ट असोशियशन प्रयत्नशील-डॉ जयपाल पाटील

मुंबई प्रतिनिधी

जेष्ठ पत्रकारांचा सन्मान वाढावा, त्यांचे पेन्शन, अधिस्विकृती पत्र, आरोग्य विषयक प्रश्न, पत्रकार कल्याण महामंडळ’,स्वतःची घरे, मुलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण या साठी सीनिअर जर्नालिस्ट असोशियशन प्रयत्नशील आहे. केरळच्या धर्तीवर पत्रकारांना घरे व पेन्शन मिळवून देण्यासाठी संघटनेचे सरकार दरबारी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सीनिअर जर्नालिस्ट असोशियशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यांनी दिली .

मुंबई व पुण्यात संघटनेचे कार्यालय सुरु झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शैक्षणिक इन्स्टिट्यूट सुरू होत आहे. या संधीचा पत्रकारांनी लाभ घ्यावा.” असे आवाहन त्यांनी केले

सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन ची बैठक मुंबईत झाली यावेळी ते बोलत होते मुंबई प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण आयचित बैठकीचे अध्यक्षस्थानी होते

असोसिएशनचे विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजय कुमार जोशी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, असोसिएशनचे शिक्षण व विकास संचालक प्रा. भूषण ओझर्डे, नवनिर्मिती व विकास संचालक शिरिष शिवणगीकर, सल्लागार ॲड.ओंकार माने, सदस्य संदीप पवार ,उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष यादवराव पावसे , उत्तर महाराष्ट्र विभागाचे सरचिटणीस सुनील गीते, नासिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके, रायगड जिल्हा अध्यक्ष पाटील, कोकणचे उद्योजक संतोष पाटील, अहिल्यानगरचे असीफ शेख आदींनी विचार मांडले. कार्यक्रमास विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी तसेच ज्येष्ठ पत्रकार सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.आयाचित बोलताना म्हणाले की, ” सर्व पत्रकारांच्या असंख्य अडचणी वर्षानुवर्षे आहे तशाच आहेत. पत्रकारांना आपले आर्थिक स्रोत स्वतःच बळकट करायला हवेत.असोसिएशन त्यासाठी प्रयत्न करीत आहे, ही समाधानाची बाब आहे. प्रिंटिंग क्षेत्रातील निरनिराळ्या संधी व तत्सम विविध क्षेत्रांत असोसिएशनच्या माध्यमातून काम करता येईल.”

विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने ‘पत्रकार कल्याण महामंडळ’ स्थापन केले पाहिजे, अशी मागणी आपण केली होती. असे सांगून आपल्या असोसिएशनने या मागणीचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे सुरू केला असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ” सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन फक्त एक संघटन नाही तर, एक मोठा समाज, परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांच्यासाठी काम करताना सरकारी स्तरावर होणारी उपेक्षा थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. अन्यथा ‘लोकशाहीचा हा चौथा स्तंभ’ इतिहास जमा होईल. केंद्र व राज्य सरकारकडे भिक नव्हे, तर हक्काने मागण्यासाठी ‘ राष्ट्रीय स्तरावर पत्रकार कल्याण महामंडळ असले पाहिजे. त्यावर अनुभवी ज्येष्ठ पत्रकारांची नियुक्ती केली जावी.”अशी मागणी त्यांनी केली.

असोसिएशनचे विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी म्हणाले की ” ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी b ही संस्था आहे. भारतीय स्तरावर पत्रकार इतर कर्मचाऱ्यांसाठी आपले एकमेव असोसिएशन आहे, तसेच मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि ऑनलाईन मीडिया यामध्ये बारा वर्षाचा अनुभव असलेल्या माध्यमकर्मी सभासद आहे . पत्रकारांचा जो हक्क आहे ते अधिस्विकृती पत्र, आरोग्य विषयक प्रश्न, मुंबई व पुण्यासारख्या ठिकाणी विश्रामगृह, त्यांना स्वमालकिची घरे, देश स्तरावर सर्व राज्यातील जेष्ठ पत्रकारांना सरसकट सन्मान मानधन इत्यादी प्रश्नावर आपण काम करत आहे
पत्रकारांच्या मुलांसाठी जर्नालिझम व औद्योगिक दृष्टिकोनातून कुशल प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन, संगणक प्रशिक्षण आदींचे विद्यापीठ आणि इतर महत्त्वाच्या संस्थांचे कोर्सेस आपण सुरू करत आहोत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक स्रोत उभे करण्यासाठी अल्कलाईन वॉटर, एसबीआय लाईफ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून काही योजना पत्रकारांसाठी प्राथमिक स्थरावर राबवत आहोत. जेणेकरून ज्येष्ठ पत्रकारांचा समाजातील आणि पर्यायाने स्वतःच्या कुटुंबातील सन्मान वाढीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून मोठा आधार लागू शकेल.”

असोशिएशनचे नवनिर्मिती व विकास संचालक तथा पुणे जिल्हा सचिव शिरीष शिवणगीकर यांनी ‘मुद्रण क्षेत्रातील वाढत्या आंतरराष्ट्रीय संधी’ याविषयी आपला अनुभव कथन केला. केनिया, मंगोलिया, द.अफ्रिका या सारख्या देशांमधून सरकारी माध्यमातून छपाई, मुद्रित शोधक, भाषांतरकार इत्यादी कामासाठी संधी उपलब्ध आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी अशी परदेशातील कामे चालू आहेत. आपण स्वतः देखील आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून ही कामे घेत आहोत. जेणेकरून मुद्रित क्षेत्रातील सर्व प्रकारची कामे व संधी आपल्याला उपलब्ध होतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

असोशिएशनचे शिक्षण आणि विकास संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांनी असोशिएशनच्या प्रस्तावित शैक्षणिक उपकमांची माहिती दिली. ते म्हणाले, “पिंपरी चिंचवड येथील निगडी प्राधिकरण येथे हे केंद्र सुरू होत असून लवकरच सर्व अभ्यासक्रम सुरू होतील,” पत्रकारांनी त्यांच्या मुलांसाठी या संधीचा लाभ घ्यावा,”असे आवाहन त्यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष यादवराव पावशे यांनी मुद्रण पत्रकारिता संपत असल्याची खंत व्यक्त करून ती टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “सध्या ग्रामीण भागात दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने वृत्तपत्र छापणे कमी व जाहिरातींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पत्रकार अडचणीत सापडला आहे, अशा कठीण प्रसंगी ग्रामीण पत्रकारांना ‘सीनिअर जर्नालिस्ट असोशिएशन’ आधार वाटू लागली आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असोशिएशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव सुनिल गिते यांनी ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे पत्रकारितेतील अडचणी सांगून सरकारने पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण महामंडळ स्थापन करावे या मागणीचे समर्थन केले.

नासिक जिल्हाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी सदस्य संख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून नोंदणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे नमुद केले.

असोशिएशनच्या कोकण विभागाचे उद्योजक संतोष पाटील यांनी राज्यातील पत्रकारांसाठी “अल्कलाईन वॉटर ” वितरणासाठी अल्पदरात उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले.या शिवाय स्टार्टअप उद्योजकांसाठी मार्गदशन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकारांच्या अधीस्वीकृती आणि सन्मान मानधन या संदर्भातील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी 16 नोव्हेंबर रोजी (सांबरी, जिल्हा रायगड ) येथे संघटनेचे राज्यातील सभासदांचा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button