अंधांना स्वावलंबी बनविणे समाजाची जबाबदारी- अॅड. विद्युल्लता तातेड.

नाशिक प्रतिनिधी
अंध व्यक्तींमध्ये अपार क्षमता असून त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि आत्मविश्वास यांची कमतरता नसते. त्यामुळे त्यांना योग्य शिक्षण,आधुनिक तंत्रज्ञान तसेच रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांना स्वावलंबी बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे,असे उद्गार दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, जिल्हा शाखा, नाशिकच्या अध्यक्षा एडव्होकेट विद्युल्लता तातेड.यांनी काढले. त्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, जिल्हा शाखा, नाशिक( नॅब ) तर्फे पांढरी काठी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडव्होकेट प्रकाशचंद्रजी सुराणा यांनी ‘नॅब’ अंधांसाठी करीत असलेल्या विविध कार्याची व उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेचे सेक्रेटरी शितल सुरांणा यांनी पांढरी काठी दिनाचे महत्त्व सांगितले.

‘नॅब’ तर्फे संस्थेच्या अध्यक्षा एडव्होकेट विद्यु्ल्लता तातेड , निर्मलाबेन शहा, संगीता शहा अनिल चव्हाण अंबादास घोरपडे एडवोकेट कांतीलाल तातेड हेमंत देशपांडे अनिल खालकर विपुलता सुराणा प्रकाश विसपुते शिल्पा संघवी आदींच्या हस्ते अंध व्यक्तींना भेटवस्तू व मिठाई देण्यात आली. निर्मलाबेन शहा यांच्यातर्फे मिल्टन कंपनीचे प्लास्टिक कंटेनरचे व विपुलता सुराणा यांचे कडून अंध बंधू भगिनींना फराळाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ‘नॅब’ च्या माजी सेक्रेटरी सौ अंजली प्रधान यांनी आपल्या वडिलांच्या शतकपूर्ती जयंती निमित्त रुपये अकरा हजाराची देणगी ‘नॅब’ ला दिली. संस्थेचे सेक्रेटरी शितल सुराणा यांनी आभार मानले.



