इतर

पुढील पिढीच्या भविष्यासाठी ,निसर्गाची जपणूक करा- बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे

अकोले प्रतिनिधी
पुढील पिढीच्या भविष्यासाठी आता तरी जागे व्हा,निसर्गाची जपणूक करा.खूप झाडे लावा.जगवा.जंगलांना वणवे लावू नकाच असे आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.कळसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारी येथील भ. बा.सावंतबाबा सभागृहाच्या उद् घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.


दररोजच्या जेवणात विकतचे विषमुक्त अन्न खाणे थांबवा.सेंद्रीय शेतीकडे वळा. काळी आई असलेली माती जिवापाड जपा. रासायनीक खते,कीटकनाशके यांच्या बेसुमार वापरातून एकदा का मातीचे आरोग्य बिघडले तर आपल्या पुढील पिढ्यांचेच अस्तित्व धोक्यात येईल. शाळा महाविद्यालयातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना हे पटवून सांगा. आपण निसर्गपूजक आहोत मग निसर्ग जोपासण्याची सर्वांधीक जबाबदारी आपलीच आहे याची आठवण ठेवा असे त्यांनी विद्यार्थी, महिला पालक यांच्यासोबत बोलतांना सांगितले.
बारी येथील कळसुबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील भ.बा.सावंतबाबा नुतन सभागृहाचे उद् घाटन पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सदाशिव खाडे होते.कार्यक्रमास धुळा पाटील खाडे, काशीनाथ खोले, नामदेव खाडे, तुळशीराम लांडगे,राजेंद्र जाधव,राजाभाऊ अवसक, पंढरीनाथ खाडे,गणेश खाडे,वैशाली दराणे,बीना सावंत,वनिता सहाणे हे उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश खाडे यांनी केले तर आभार दत्तात्रय कासार यांनी मानले.कार्यक्रमास बारी,जहागिरदारवाडी,पेंडशेत येथील ग्रामस्थ, महिला पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button