रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करा — प्रा डॉ. जयपाल पाटील

पोयनाड :- आपण ज्या समाजात आई-वडिलांच्या कृपेने जन्मलो आणि आपली प्रगती झाली, त्या समाजासाठी कायम देणेकरी असल्याने वेळ मिळेल तेव्हा व नियमित समाजसेवा करून आनंद मिळवावा असे आवाहन प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्या मार्फत होणाऱ्या समाजसेवी कार्यक्रमात अतिशय मोलाची मदत करतात याबद्दल त्यांचे कौतुक श्री. आशिष दहातोंडे पोलीस उपविभागीय अधिकारी, यांनी केले आणि पोलीस मित्रांना नियमित मदत केली जाईल असे पोलीस निरीक्षक श्रीमती आर. जी. नदाफ यांनी सांगितले.
यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी पोलीस मित्रांना घरातून बाहेर जाता येता रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने 108 रुग्णवाहिकाच बोलवावी आणि मदत करावी यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयातर्फे रोख बक्षीस दिले जाते. हा मदतीचा आदर्श सर्वत्र पोचवा पावसाळी वातावरनात वीजा पडून नुकसान होते यासाठी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर दामिनी ॲप डाऊनलोड करून ठेवा म्हणजे आपल्या पासून किती वेळाने व किती अंतरावर वीज कोसळणार आहे हे माहीत होऊन आपण सुरक्षित राहू शकता असे सांगितले.
यावेळी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री प्रवीण वावेकर यांनीही डीवायएसपी श्री. आशिष दहातोंडे व पोलीस निरीक्षक श्रीमती नदाफ यांचे कायम सहकार्याबद्दल आभार मानले शेवटी गुप्त शाखेचे पोलीस हवालदार श्री. राकेश मेहकर यांनी आभार मानले.


