इतर

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन

अहिल्यानगर : (प्रतिनिधी) अहिल्यानगरच्या राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button