रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने रोटरी डीस्ट्रीकट ३०३० स्थरावर इंट्रॅक्टर गटासाठी How Can I Be a Better Interactor?, रोट्रॅक्टर गटासाठी The Four-Way Test: Its Relevance in My Life आणि रोटेरियन गटासाठी My Healthy Club या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गटातील तीन पारितोषिक देण्यात आले यात इंट्रॅक्टर गटात होरायझन सीबीएसई स्कूल, नाशिक येथील ओवी अनूसे, रोट्रॅक्टर गटात मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचा ओंकार होले, तर रोटेरियन गटात रोटरी क्लब ऑफ नागपूर डाउनटाउनच्या रोटेरियन डॉ. प्रतीक्षा मायी यांनी प्रथम क्रमांक पटकावला . याशिवाय द्वितीय व तृतीय व प्रत्येक गटातील तीन स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देवून माजी प्रांतपाल रोटे. राजीव शर्मा, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्ष रोटे. शिल्पा पारख ,इनक्लेव्ह चेअर रोटे. संजय कलंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
स्पर्धेचे परीक्षक म्हणून रोटे. मंगेश अपशंकर, रोटे. रवी महादेवकर, रोटे. डॉ. स्रिया कुलकर्णी, रोटे. कीर्ती टाक, रोटे. अनिल सुकेंनकर आणि रोटे. विनायक देवधर यांनी काम पहिले.त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. रोटे. पल्लवी देशपांडे आणि रोटे. मयूर चिंधडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटे. नेहा मेहेर आणि रोटे. सोनाली चिंधडे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकल्प सचिव रोटे. हेमराज राजपूत यांनी आभार मानले . यावेळी माजी अध्यक्ष रोटे. दिलीपसिंग बेनीवाल, रोटे. ओमप्रकाश रावत. यांच्यासह अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.



