आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२६/०७/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण ०४ शके १९४८
दिनांक :- २६/०७/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०७:०५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति १३:५८,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति ०७:३५,
योग :- ऐंद्र समाप्ति २२:०५,
करण :- कौलव समाप्ति २७:०८,
चंद्र राशि :- वृश्चिक,(०७:३५नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:२८ ते ०७:०५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५० पर्यंत,
❀ दिन विशेष:
प्रदोष, वामन पूजन, शाक-गोपद्मव्रतारंभ, घबाड ०७:३५ प., दग्ध १३:५८ प., त्रयोदशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०४ शके १९४८
दिनांक = २६/०७/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल.
वृषभ
नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल.
मिथुन
कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा.
कर्क
नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल.
सिंह
मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील.
कन्या
कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी.
तूळ
घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.
वृश्चिक
जिभेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
धनू
मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे.
मकर
आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.
कुंभ
अधिकार्यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा.
मीन
सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
i

