न्याहळोद येथील नूतन विद्यालयात 35 वर्षांनी जुन्या सवंगड्यांच्या झाल्या भेटी!

(संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
महात्मा ज्योतिबा फुले संचलित नूतन विद्यालय न्याहळोद येथील 1990- 91 बॅचचे वर्गमित्र विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा नूतन विद्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
गेट-टुगेदर निमित्ताने पाचवी ते दहावीपर्यंत एका वर्गात शिकत असलेले सर्व मित्र मैत्रिणी 35 वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांनी एकमेकाला विचारपूस करून हस्तांदोलन केले या निमित्ताने सर्व विद्यार्थी एकत्र येऊन स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.
काही महिन्यापूर्वी दिलीप वाघ व सहकारी यांनी ग्रुप बनवून एकमेकांचे नंबर ॲड केले तदनंतर स्नेह मेळाव्याचे आखणी केली या निमित्ताने वर्गशिक्षक विजय सूर्यवंशी ,बी.जे रायते, नितीन जैन, व हंसराज महाजन यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर काही विद्यार्थिनी यांचे पती वारलेले अशा महिलांना साडी चोळी देऊन गौरवित करण्यात आले. सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत परिचय दिला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक विजय सूर्यवंशी भैय्या सर भगवान रायते नितीन जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन दिलीप वाघ, भाऊसाहेब शिंपी, नानू पाटील, शिवाजी माळी ,उमेश जाधव, आदींनी केले. या वेळी शालिनी घरटे, कमल जाधव, चित्रा जिरे, सुनंदा क्षीरसागर ,शोभा बोरसे, शालिनी रायते मनीषा पवार, वैशाली अमृतकर, मोहन काकुळदे, भाऊसाहेब शिंपी, सुनील माळी, नानू पाटील, मीनल माळी ,अर्चना माळी ,मधुकर रायते, जावेद खाटीक, महेश भावसार, नरेंद्र अहिरे, निंबा शेटे ,प्रमोद महाजन, दादाजी जाधव ,शिवाजी माळी, सुधाकर रोकडे ,विजय सुतार, हनीफ पठाण ,सुकलाल कडरे ,राजू जाधव विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.