करियर मंथन” एक विद्यार्थी प्रिय उपक्रम!

नाशिक दि १६
रोटरी क्लब ऑफ नासिक च्या इंटरॅक्ट क्लब तर्फे “करियर मंथन” हा अतिशय विद्यार्थीप्रिय कार्यक्रम झूम प्लॅटफॉर्म वर दर महिन्यात घेतला जातो. नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेले हा कार्यक्रम जानेवारी 2022 मध्ये 14 मालिका पूर्ण झाल्या असल्याची माहिती इंटरॅक्ट डायरेक्टर्स सौ.अदिती अग्रवाल व सौ.किर्ती टाक यांनी दिली.
प्रसिद्ध करियर समुपदेशक व रोटेरियन प्रा. श्री.विक्रम बालाजीवाले या कार्यक्रमाचे चेअरमन तसेच समन्वयक आहेत. शालेय अभ्यासक्रमाच्या सोबतच करियर चे मार्गदर्शन तितकेच महत्वाचे आहे. हाच उद्देश समोर ठेवून या कार्यक्रमाची आखणी केली जाते
. शिवाय विद्यार्थ्यांना कार्यक्रम कसा सादर करावा याचेही प्रशिक्षण देऊन हा कार्यक्रम शालेय विद्यार्थीच प्रस्तुत करतात. आता पर्यंत करियर मंथन झालेले विषय वा त्यासाठी आमंत्रित तज्ञ-नोवेंबर 2020 – आरकीटेक्चर – अर्की. दीप भागवत व अर्की. धनंजय शिंदे
डिसेंबर 2020 – आर्टिफीशीयल इंटेलीजंस व रोबोटीक्स – प्रो. धिरज सिन्हा व श्री. बिरेन शाह
डिसेंबर 2020 – आर्टिफीशीयल इंटेलीजंस व रोबोटीक्स-II – प्रा. श्री.विक्रम बालाजीवाले व सौ. किर्ती टाक
जानेवारी 2021 – एरोनॉटीकल इंजीनियर व पायलट – ग्रुप. कॅप. विनायक देवधर, श्री.नारायण चिटगूप्पी व विंग कमांडर एल. बिश्वाल
फेब्रुवरी 2021 – फिल्म – श्रीपाद देशपांडे व सत्यजीत केळकर
मार्च 2021 – लिबेरल शिक्षण – मिनू अरोरा व हंसा सचदेवा
जून 2021 – जरनॅलीजम – डॉ.वैशाली बालाजीवाले व प्रो.काजोरी सेन
जुलै 2021 – फूड सायन्स – गोपी रमन व राजीब सहा ( अनंता इंटेरॅक्ट क्लब द्वारा प्रस्तुत)
ऑगस्ट 2021 – आय ए एस – डॉ. विजय सूर्यवंशी, म्युनिसीपल कमीशनर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका (वी.पी.पी.मराठी,इंटेरॅक्ट क्लब द्वारा प्रस्तुत)
सप्टेंबर 2021 – करीअर्स अराऊंड स्टार्ट अप्स – माशीया चे अध्यक्ष श्री.संतोशजी मांडलेचा व पुणे येथील entrepreneur व innovator श्री.मनीष पाटील ( आरजेईएमएचएस इंटेरॅक्ट क्लब द्वारा प्रस्तुत)
ऑक्टोबर 2021 – करीअर्स अराऊंड क्रिएटिव राईटिंग – मीताली जोशी , चित्रपट व नाट्य लेखिका व पुजा प्रसून लेखिका. ( अशोका यूनिवर्सल स्कूल, चांदसी, इंटेरक्ट क्लब द्वारा प्रस्तुत)
या सर्व कार्यक्रमांना विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. हजारोंच्या संख्येनी या कार्यक्रमांना व्युयर्स मिळत आहेत. या महिन्यातील करियर मंथन चा विषय आहे“Careers around Sports Management. तज्ञ आहेत श्री.देवेंद्र प्रभुदेसाई, एक्स मॅनेजर, मीडिया रीलेशन्स BCCI अवंति देसाई, incharge, आउटरिच , आयआयएसएम. व समन्वयक आहेत करियर प्लॅनिंग अँड डेवलपमेंट कन्सलटंट प्रा.विक्रम बालाजीवाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत फ्रावशी अकॅडेमी, इंटरॅक्ट क्लब .
सदर कार्यक्रम मंगळवार, 18 जानेवारी 2022 सायंकाळी 5.00 वा. रोटरी क्लब ऑफ नासिक च्या फेसबूक लाइव वरुन पाहता येईल. रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा डॉ.श्रीया कुलकर्णी, तसेच करियर मंथन टीम चे ग्रुप कॅप्टन विनायक देवधर, मकरंद चिंधडे, आदींनी विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.