कोल्हेवाडीत हल्ल्यात बहिण-भावावर कोल्हेवाडीत बिबट्याचा हल्ला !

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे घरी जात असताना अचानक उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या दोघा बहिण-भावावर हल्ला करत त्या गंभीर रित्या जखमी केले आहे
कोल्हेवाडी येथील नरोडे मळ्या मध्ये राहणारे प्रवीण नरोडे त्याची बहीण पुजा नरोडे हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संगमनेर येथून घरी परतत होते यावेळी ते
घराजवळ आले असता अचानक उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेऊन हल्ला केला. यावेळी ते दोघे भाऊ बहीण गाडीवरून खाली पडले, असता दोघा नीही मोठ्या मोठ्याने ओरडल्याने बिबट्याने पळ काढला
बिबट्याने हल्ल्यात पूजा नरोडे हिचा पायाला जबरी चावा घेत जखमी केलेअसून प्रवीण हि या हल्ल्यात जखमी झाला आहे
दोन बहिण भावांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले, मात्र बहीण पूजा ही जास्त जखमी असल्यामुळे तिला पुढील उपचारा साठी नाशिक येथे नेण्यात आले आहे। बिबट्याने हल्ला केला असल्याची माहिती मिळताच संगमनेर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या परिसरामध्ये अजूनही बिबटे असल्याची शक्यता आहे त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन नंदू दिघे
उपसरपंच संजय कोल्हे, माजी सरपंच जालिंदर दिघे, मोहन बाबा वामन,अमोल कोल्हे, व नरोडे मळा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे