इतर
पाडळीतील नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा सत्कार.

सभासदांचे हित जोपासल्यास संस्थेची प्रगती .-विक्रमसिहं कळमकर
दत्ता ठुबे/पारनेर-प्रतिनिधी
पाडळी सेवा संस्थेचे नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून नावलौकिक वाढवावा, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिहं कळमकर यांनी व्यक्त केले.
पाडळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी डी.बी.आण्णा करंजुले व व्हाईस चेअरमन पदी आप्पासाहेब कळमकर यांची निवड झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.या वेळी दादाभाऊ वारे,गंगाराम कळमकर, मुकेश गवळी,दीपक करंजुले,आप्पासाहेब साठे,सुधाकर (काका) कळमकर,दौलतराव खणसे पाटील. संजय वाखारे,विठ्ठलराव साठे उपस्थित होते.