नूतन महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

संगमनेर -प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2025 वार शनिवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. संजय टाक प्रमुख व्याख्याते, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजी साबळे माजी सिनेट सदस्य सा.फु. पुणे विद्यापीठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले,व कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला.
प्रमुख अतिथी मा.प्रा. संजय टाक यांनी विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे,जीवनात परिस्थितीचा बाऊ न करता परिस्थितीवर मात करावी,असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी साबळे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये एन.एस.एस, विद्यार्थी विकास मंडळ,क्रीडा विभाग,कला व सांस्कृतिक विभागांतर्गत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननिय अध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व संचालक, प्राध्यापक आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कला व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शितल देशमुख यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगिता भवर व जयश्री चव्हाण यांनी केले.