संगमनेर चे डॉ. मुटकुळे यांना राज्य सरकारचा भा. रा. भागवत पुरस्कार जाहीर

संगमनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2021 च्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .त्यात संगमनेर येथील नाट्य लेखक डॉ. सोमनाथ मुटकूळे यांना बाल वाड्मय नाटक व एकांकिका क्षेत्रासाठीचा भा.रा. भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य शासनाने 2021 चे साहित्य व वाडंमयीन प्रकारातले वेगवेगळ्या विषयासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत . डॉ. मुटकुळे यांनी संत तुकारामांच्या जीवन चरित्र व तत्त्वज्ञानाची आधुनिक परिभाषित केलेली मांडणी खेळ मांडलेला या नाटकाच्या द्वारे रसिकांसमोर आणली आहे. सनय प्रकाशन नारायणगाव यांच्या वतीने या पुस्तकाचे मागील वर्षी प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकाला 50 हजार रुपये रोख सन्मानचिन्ह देऊन राज्य सरकारच्या वतीने मुटकुळे यांना सन्मानित करण्यात येणार आहेत. खेळ मांडीयेला हे नाटक नुकतेच राज्य नाट्य स्पर्धेतही संगमनेर येथे कलाकारांनी सादर केले होते. मुटकूळे यांना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कारही मागील वर्षी प्राप्त झाला आहे. डॉ.मुटकुळे हे नाट्य क्षेत्रातील वैचारिक नाट्य लेखनासाठी महाराष्ट्रभर ओळखले जातात. त्यांनी वीस पेक्षा अधिक नाटकांचे लेखन केले आहे. त्यातील अनेक नाटके राज्य व राष्ट्रीय स्तरावरती सादर झाले असून अनेक नाटकांना पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रभर त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रबोधननाट्य चळवळीसाठीचा पुरस्कार
राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार माझ्या नाट्य लेखनासाठी असला तरी शाहू ,फुले, आंबेडकर आणि संत साहित्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नाटकाच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे तो पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचाराचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया डॉ. मुटकुळे यांनी दिली.नाट्य ही अंत्यत प्रभावी व परिणामकारक कला आहे.समाजमन घडविण्याची शक्ती त्यात सामावली आहे.त्यामुळे या कलेचा उपयोग अधिकाधिक समाज प्रबोधन करण्यासाठी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.त्यामुळे हा पुरस्कार प्रबोधन करणार्या नाट्य चळवळीसाठी काम करणाऱ्या सर्वांचा आहे.
डॉ.सोमनाथ मुटकूळे