बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम राष्ट्र संतभगवान बाबा यांनी केले – अॅड शिवाजीराव काकडे

जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने संत भगवानबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आडलेल्या, गांजलेल्या, बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी केले. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी समाजाला दाखवला असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे केले.
जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने आज दि. १८ रोजी ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी एकनाथ काटे, विनायक काटे, विष्णू दिवटे, अशोक दातीर, संभाजी मराठे, विष्णू गायधने, विष्णू मराठे, रखमाजी काटे, शंकर काटे, अशोकराव ढाकणे, रमेश दिवटे, बाबासाहेब इथापे, रविंद्र कुसळकर, अजिनाथ विघ्ने, शिवाजी पाटेकर, आकाश ढोले, शाम दळे, संतोष रुईकर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. काकडे म्हणाले की, आयुष्यात अनेक हाल अपेष्टाही राष्ट्रसंत संत भगवान बाबा यांच्या वाट्याला आल्या. पण त्यातून संयम राखून त्यांनी स्वतः श्रेष्ठत्व आपल्या आचरणाद्वारे सिद्ध केलं. अशा थोर संताला पुण्यतिथी निमित्त जनशक्ती विकास आघाडीकडून विनम्र अभिवादन असेही ते म्हणाले.