
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र, कामे चालू असताना ठेकेदाराकडून काम चांगले करून घेण्यासाठी ज्या- त्या गावचे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपं च व सामाजिक कार्यकर्ते यांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन आमदर डॉ. किरण लहामटे यांनी केले.
समशेरपूर येथे मोरदारी ४ कोटी ६७ लाख रुपयांचा पाझर तलावाचे भूमिपूजन व नागवाडी २० लाख रुपयांचा सभामंडप व टाहाकारी येथे २० लाख व केळीरुम्हणवाडी
या गावातील २० लाख खर्चाचे रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी आ. डॉ. लहामटे बोलत होते.
आमदर डॉ. लहामटे म्हणाले की, तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विविध खात्याचे मंत्री यांच्याकडे असणाऱ्या खात्याकडून निधी मिळत असल्याने अनेक कामे मार्गी लागतील. आघाडी सरकार मुळे तालुक्याला निधी कमी पडणार नाही

याप्रसंगी पोपट दराडे, कोंडाजीढोन्नर, मधुकर बिन्नर, बबन सदगीर, सुनील दराडे, अशोक एखंडे, दशरथ एखंडे, नितीन बेनके यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक समशेरपूरचे उपसरपंच सचिन दराडे यांनी केले. अभार टाहाकारीचे सरपंच शिवाजी एखंडे यांनी मानले.
====================================
