राजापूर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
—संगमनेर तालुक्यातील राजापूर महाविद्यालयात शनिवार दिनांक 15/ 1/ 2022 रोजी *एक दिवशीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे महाविद्यालयाच्या IQAC व वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत भारतातील अनेक राज्यांच्या तसेच अनेक देशांच्या संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने इराक आणि पाकिस्तान या देशांमधील दोन संशोधकांनी आपला अनुभव देखील कार्यशाळेदरम्यान व्यक्त केला.
या कार्यशाळेसाठी रशियातील प्रोफेसर *नरीना*रिंगो *मॅडम यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष वरपे यांनी प्रयत्न केले.
सदर कार्यशाळेसाठी डॉ. डी वाय पाटील महाविद्यालय पुणे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनीही उस्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी कार्यशाळेसाठी उपस्थित व सहभागी संशोधक विद्यार्थी प्राध्यापकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले .रशियाच्या प्रोफेसर नरीना रिंगो मॅडम यांच्या व्याख्यानाचा सर्वांना आपल्या जीवनात इकाॅलाॅजीचे युग आणि शाश्वत विकास याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
महाविद्यालयात प्रथमच आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिल गोडसे सेक्रेटरी अॅड. कैलास हासे, उपाध्यक्ष आर पी हासे (नाना), व संस्थेचे सर्व सदस्य यांनी प्राचार्य सुभाष कडलग व संयोजन समितीचे प्रा. सुभाष वर्पे व सहकारी यांचे कौतुक केले.

पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक साबळे (शेलकर) मॅडम यांनी करून दिला तर प्राध्यापिका सविता हासे मॅडम यांनी आभार मानले .