संत भगवान बाबांना अनोखी आदरांजली!

: अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मुंगूसवाडे येथील श्रावण भारती प्रशालेचे कला शिक्षक किशोर जगताप यांनी श्री संत भगवान बाबा ना अनोखी आदरांजली अर्पण केले
१८जानेवारी२०२२ श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त शाळेतील भिंतीवरील काळया फळ्यावर रंगीत खडूने श्री संत भगवानबाबां चे चित्र रेखाटले आहे हे रेखाटलेले चित्र सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे
.माझे फलक रेखन
असेल तर जमिनी विका पण लेकराला शिका असा संदेश समाजाला देऊन न थांबता बहुजन समाजातील लेकरांना शिक्षणाची दारे खुली करुन शाळा महाविद्यालय व छत्रालय सुरु करून आपल्या किर्तनातुन अंधश्रद्धा व अनिष्ट रुढी परंपरा बंद करणारे विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे महान विभूती ऐश्वर्यसंपन्न संत वै.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त हे चित्र रेखाटली असा संदेश या चित्रातून दिला आहे हे चित्र रंगीत खडू च्या सहाय्याने काढले आहे
त्यांच्या कलेला सर्वत्र दाद दिली जात आहे