कवयित्री महमूदा शेख यांच्या तीन पुस्तकाचे थाटात प्रकाशन

देहू-श्रीक्षेत्र देहूगावचे कन्यारत्न कवयित्री सौ. मेहमूदा रसुल शेख यांच्या काव्यलतिका,गुलपरी आणि लाजवंती या तीन काव्यसंग्रहांचे प्रकाशन डाॅ.मधुसूदन घाणेकर, गझल गुरु डाॅ.रे.भ.भारस्वाडकर आणि साहित्य सारथी मंचचे
अध्यक्ष डाॅ.प्रशांत पाटोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
श्री राजेंद्र सोनवणे नक्षत्राचं देणं संस्थापक,कवी डॉ.अहेफाज मुलानी, गझलकारा फातिमा शेख मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या संमेलनाध्यक्षा अनिसा सिकंदर शेख ,गझलकार श्री. मोहन जाधव, गझलकार श्री बबन धुमाळ,उद्योजिका फरिदा अब्दुल शेख, श्री ललित कोलते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शेख उभयतांनी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ फुल देऊन सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी बोलताना प्रतिभावंत कवी हा समाजाला जीवनाविषयी आत्मज्ञान देत असतो. कवित्री ने आपल्या प्रगल्भ प्रतिभेने सामाजिक समरसतेचे संवर्धन केले पाहिजे व सामाजिक कार्यात अधिक योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत कलावंत आणि पहिल्या विश्वकव्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ मधूसुधन घानेकर यांनी केले
यावेळी त्यांनी 2024 साठीचा साहित्य गौरव संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार सौ कवियत्री महमूद शेख यांना जाहीर केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गझल गुरू डॉ. रे. भ. भारस्वाडकर सर यांनी पैसे भरून एका दिवसाच्या कार्यशाळेत गझल शिकता येत नाही ही खंत व्यक्त केली आहे. आजपर्यंत त्यांनी गझल शिकविण्यासाठी व नवीन गझलकार उदयास येण्यासाठी मोफत कार्यशाळा सुरू केल्या आहेत आणि अशाच कवयित्री किरण चौधरी यांच्या रणरागिणी गझल कार्यशाळेत कवयित्री मेहमूदा रसुल शेख हा पहिला ” गझल डायमंड” सापडला असे गौरवोद्गार त्यांनी काढले व त्यांनी उत्तमोत्तम गझल लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसिध्द कवी प्रा. राजेन्द्र सोनवणे राष्ट्रीय अध्यक्ष, नक्षत्रांचं देणं काव्यमंच पुणे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात नवीन कवींना व्यासपीठ मिळत नाही त्यांची अवहेलना होते याबद्दल दु:ख व्यक्त केले.डाॅ.पाटोळे यांनीही शुभेच्छा दिल्या व आपली स्वरचित एक सुंदर गझल सादर केली.ज्येष्ठ गझलकारा व फातिमा शेख काव्य संमेलनाध्यक्षा अनिसा शेख यांनी मुस्लिम कवयित्री मराठी साहित्यात पुढे येत आहे याचे कौतुक केले व फातिमाबीचा आम्हाला वारसा मिळाला आहे त्यांचे कार्य असेच पुढे चालवू आणि कवयित्री मेहमूदा यांच्या साहित्यिक वाटचालीबाबत समाधान व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
इंद्रायणी साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष अहेफाज मुलाणी यांनी कवयित्री मेहमूदा शेख यांनी एकदम तीन काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या लाजवंती या मुखपृष्ठाचे कौतुक करताना ते म्हणाले की डोक्यावर पदर घेऊन समोर पाहताना जणू विठ्ठल आर्शिवादच देत आहे असे वाटते. कवयित्री मेहमूदा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोनाने अनेक कुटुंब उध्वस्त झाली पण याच कोरोना काळात माझा कवयित्री म्हणून पुर्नजन्म झाला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही असे उद्गार काढले. आपल्या साहित्यिक प्रवासाचे सगळे श्रेय जगदगुरु तुकोबा महाराज व अनगड शहावलीबाबांना व आपल्या आईला देवून टाकले त्या म्हणाल्या या दोन्ही संतांचा त्यांच्या डोक्यावर वरद हस्त असल्यामुळे आणि आपल्या आई वडील व सासू सासरे यांच्या आर्शिवादानेच मी हे करू शकले. आपल्या आईविषयी बोलताना त्या म्हणाल्याआपली आई म्हणजे म्हणींचा चालता बोलता पिटारा होती आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगताना ती म्हणींचा वापर करायची आणि त्याच म्हणींचा प्रभाव त्यांच्या खोल काळजावर कोरला गेला आहे तिने केलेल्या संस्कारांच्या प्रेरणेतून माझ्या कवितेची वाटचाल यशस्वीरित्या चालू असल्याचे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या 449 व्या अंकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्थात गझल मुशायरा व काव्य मैफिल रंगत गेली. या मैफलीचे अध्यक्षस्थान श्री गझलकार बबन धुमाळ यांनी भूषवले .यामध्ये सर्व मान्यवरांसह कवी अशोक शिंदे,अॅड रामचंद्र पाचुणकर, आत्माराम हारे, संतोष गाढवे, डॉ.अहेफाज मुलाणी, प्रकाश गायकवाड, विजय चव्हाण,राहुल भोसले,संजय चव्हाण,लखन जाधव,समीर पठाण, रोहन, पवार,कवयित्री कमल आठवले,सुनिता घोडके, रूपाली भोरकडे, सना कर्णेकर,वृशाली आढाव,ज्येष्ठ गझलकार , आनंद गायकवाड,ज्येष्ठ गझलकारा नंदिनी काळे,सिंधू साळेकर, प्रतिभा विभुते, अशा विविध ठिकाणांवरुन आलेल्या एकूण २३ गझलकार/ गझलकारा व कवी/कवयित्री यांनी सहभाग घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचल कवयित्री सौ. वृषाली यांनी मधाळ वाणीने केले .पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.