अकोल्यातील भाजपचे अस्तित्व राष्ट्रवादी मुळेच – सौ उज्वला राऊत

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील भाजप चे अस्तित्व हे राष्ट्रवादी मुळेच तयार झाले आहे त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी वर टीका करण्याचा अधिकार नाही असा टोला लगावला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या महिला तालुका अध्यक्ष सौ उज्वला राऊत यांनी म्हटले आहे की अकोले तालुक्यात नगरपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते हे परखडपणे विकासाच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडताना दिसत होते, तर विरोधी पक्ष म्हणजे भाजपाचे नेते हे पातळी सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे आणि जिल्हा बॅंकेचे संचालक सिताराम पाटील गायकर यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिका करत होते, विरोधकांचे आज जे काही अस्तित्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार यांनी दिलेले आहे आणि आपण नगरपंचायत कशी घेतली हे चांगले माहित आहे (पैशाची उधळण करून), आणि ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आपण बोलत आहात त्यांनी आपल्या पडत्या काळात आपल्याला बहुमोल साथ दिली होती हे आपण विसरू नये कारण तुम्ही जे मोठे झाले आहात त्यात गायकर साहेब यांची मोलाची भर आहे पण त्याची जाणीव न राखता आपण धोतर जे वेशीवर टांगले ते धोतर महाराष्ट्रातील संतांची आणि महाराष्ट्राची शान आहे, आणि शहर काबीज केले म्हणून हवेत तरंगत आहात ना, तर पाय जमिनीवर राहणे गरजेचे आहे आम्ही खूप सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि आमची साथ नेहमी आमच्या नेत्यांना आहे, आम्ही राजकारण नाही तर समाजकारण करतो, आमच्यापैकी कोणत्याही पदाधिका-याने राजकारणात येऊन पैसा नाही कमावला आम्ही प्रामाणिकपणे समाजाभिमुख कार्य करतो,म्हणून विकासाच्या मुद्द्यावर सोडून आम्ही बोलत नाही आणि म्हणून ग्रामीण भागातील जनता आपलं हे वागणं बघत आहे याची भान राखलं पाहिजे,
आम्ही आमच्या नेत्यांची बाजू मांडतो तर त्याचे कारण म्हणजे त्यांची जनतेप्रती असणारी आपुलकी आणि तालुक्यातील जनतेसाठी विकास, तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून असणारी तळमळ, कुणाच्याही सुखद:खात सहभागी होण्याचा स्वभाव, आमदार असले तरीही सामान्य आयुष्य जगण्याची त्यांची कला हे नेहमी जनताही बघत आली आहे , कुणीही आमदार साहेबांना भेटू शकतं बोलू शकतं आपले कामे करून घेऊ शकतं इथून मागे हि परिस्थिती तालुक्यातील जनतेला कधीही दिसली नाही .. भाजपा ने शहराच्या निकालावर अंदाज बांधणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण असल्याचे सौ उज्वला राऊत म्हणाल्या