एकत्रितपणे केलेला सण महिलांना प्रेरणा देणारा असतो- सौ.प्रमिला घोडके

सोनई प्रतिनिधी
—दैनंदिन जीवनात पारंपरिक पद्धतीने सण साजरे केले जातात, पण एकत्रितपणे केलेला सण हा महिलांना प्रेरणा देणारा,एकमेकांचे विचाराने दिशा ठरणारा असतो, असे प्रतिपादन तेली समाजाचे जिल्हा कार्यकारिणीच्या महिला अध्यक्ष सौ.प्रमिला घोडके यांनी केले.
घोडके ह्या विठ्ठल मंदिर येथे आयोजित केलेल्या तेली समाजाच्या मकरसंक्रांत निमित्ताने महिला हळदी कुंकू समारंभात बोलत होत्या.प्रारंभी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष सुजाता क्षीरसागर ह्या होत्या.
अंजली वाकचौरे यांनी स्वागत तर प्रस्तावित आदिनाथ मोरे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना चोथे, शिवकण्या जाधव,सुनीता जाधव,सुमन कर्पे,प्रकाश चोथे,विजय लोखंडे,बंडू जाधव,संजय क्षीरसागर, हे होते.मनोगत आशाताई सुद्रीक यांनी केले. याप्रसंगी तेली समाजाचे भूषण व एम .पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण होऊन आर.टी. ओ.पदी निवड झाल्याबद्दल प्रियांका चोथे, तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून उत्कृष्ट कार्याबद्दल राजेंद्र निंबाळकर यांचा सन्मान समाजाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी आशा सिद्रीक,निर्मला क्षीरसागर, अनिता खंडागळे,प्रीती देशमाने, अर्चना खंडागळे, अलका सुरसे, सुरेखा क्षीरसागर अरुणा सुद्रीक,,कल्पना सुद्रीक,सुशीला सिद्रीक,सिंधू सुरसे,कल्पना जगताप,प्रभावती सुरसे,मनीषा जगताप,शामा सोनवणे,नलिनी थोरात,उर्मिला शेजवळ,आदी उपस्थित होत्या. आभार भक्ती क्षीरसागर यांनी मानले.गीता खंडागळे, भक्ती क्षीरसागर, वर्षा सुरसे यांनी यासाठी परिश्रम घेतले.