जागतिक महिला दिनानिमित्त दिशा उत्सवाचे आयोजन

दत्ता ठुबे
मुंबई दि१३ –दिशा महिला मंच आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त दिशा उत्सवाचे आयोजन वामनराव पै हॉल सेक्टर 6 कामोठे येथे शनिवार दिनांक 11 मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाला समाजसेविका इंदू झा व आर के ग्रुप चे डायरेक्टर मा. श्री. राजेंद्र कोळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या उत्सवामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. स्वाती माने, डॉ.रुखसाना खान, डॉ.सुवर्णा माने चोपडे, डॉ. रुक्मिणी अर्जुन, डॉ,स्वाती वारे , डॉ श्वेता गजभिये भालेराव, अनिता जंगम या डॉक्टरांना तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सौ. वीणा साळवी, सौ. अर्चना जाधव व सौ. निर्मला अरोरा यांना दिशा सन्मानाने सन्मानीत करण्यात आले तसेच या उत्सवामध्ये तुलसी ज्वेलर्स ची ज्वेलरी परिधान करून महिलांनी ज्वेलरीचा साज शृंगार आगळ्या वेगळ्या पद्धतीने सादर केला.
व्यासपीठावर व्यक्त किंवा काहीतरी करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी ‘माझं व्यासपीठ माझी बकेट’ लिस्टचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. महिलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत, मनोगत व्यक्त करत, चारोळ्या तसेच कविता बोलत आपल्या आयुष्यातील बकेट लिस्ट मधील इच्छा दिशा व्यासपीठावर पूर्ण केली. विनस वूमन्स हॉस्पिटलच्या डॉ सुवर्णा चोपडे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तर डॉ श्वेता गजभिये यांनी हॉस्पिटल मार्फत 8 ते 15 मार्च दरम्यान गर्भवती महिलांनी नोंदणी केल्यास 20% डिस्काउंट व मुलगी झाल्यास पाच हजार रु मुलीच्या अकाउंटला टाकण्याचेही यावेळी जाहीर केले. आलेल्या मान्यवरांनी व्यासपीठ व कार्यक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका सौ निलम आंधळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत दिशा व्यासपीठाच्या कार्याविषयी थोडक्यात आढावा घेत व्यासपीठाशी जोडलेल्या सर्व सख्या, सहकार्य करणाऱ्या संस्था, पत्रकार व पत्रकारसंस्था बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तुलसी ज्वेलर्स, परिवार,साई द्वारका क्लीनिक, व नर्सिंग होम,सुषमा पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज कामोठे,आरोही सामाजिक विकास प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य मिळाले तसेच यावेळी कुटे ग्रुप कडून महिलांना छोटंसं गिफ्ट ही देण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षा विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत हसत्या खेळत्या वातावरणात उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली तसेच व्यासपीठाच्या सेक्रेटरी ख़ुशी सावर्डेकर यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. इतर सदस्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत कार्यक्रमाच्या शेवटी वूमन्स डे जल्लोषात साजरा केला.
