इतर

आबासाहेब काकडे विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग होत्या. विद्यालयाचे प्राचार्य मा. संपतराव दसपुते , उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड यांच्या हस्ते व्यासपीठावरील प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली

.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. विद्यालयाचे सहशिक्षक पंढरीनाथ पल्हारे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट सादर केला.

यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनींनी विद्यालयाचा परिसर स्वच्छ केला . श्रमदानातून स्वच्छतेचा संदेश विद्यालयातील विद्यार्थी व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीला धिंदळे यांनी केले .

सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केले तर आभार रामदास पांढरे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने भाग्यश्री गडाख, प्रांजली बढे व सहदेव साळवे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button