शेनीत येथील डॉ. राजेंद्रप्रसाद आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

राजूर / प्रतिनिधी
शेणित, ता. अकोले, येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या निमित्ताने आश्रमशाळेत ध्वजारोहण करण्यात आले .
आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी व सध्या सी.आर.पी. एफ., झारखंड येथे कार्यरत असलेले वासुदेव किसन धांडे (अंबेवंगण) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी प्रमुख अतिथी पो. ना. सौ. निता ज्ञानेश्वर धोंगडे, रेल्वे पोलिस, मुंबई, ज्ञानेशवर धोंगडे (इंजि.) शरद दत्तू धोंगडे सर – जिल्हा प्रशिक्षक- स्काऊट व गाईड हे उपस्थित होते .
अध्यक्षस्थानी साबळे एस् .डी.मुख्याध्यापक
हे होते. विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन व त्याचे महत्त्व या विषयी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर सौ. निता धोंगडे , संजयकुमार शिंदे, माध्य. मुख्याध्यापक यांनीही प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच निबंध स्पर्धेतील प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले .
कार्यक्रमाचे दरम्यान कु. सानिया उत्तम धांडे इ. ९ वी हिने राष्ट्रमाता जिजाऊ हा एकपात्री प्रयोग सादर केला तर काही मुलींनी पोवाडा सादर केला .
ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर निता धोंगडे यांनी आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थीनींना स्. व-संरक्षणाचे धडे दिले. त्यामुळे विद्यार्थीनींमध्ये जोश व आत्मविश्वास दिसून आला .
ध्वजारोहण कार्यक्रमाचे वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सूत्रसंचालन श्री. गभाले वाय व्ही यांनी केले तर आभार आरोटे डि टी यांनी मानले .
