नाशिक दि २७
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि.२६ जानेवारी २०२२ रोजी रोटरी क्लब ऑफ नासिक आणि सिंगर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हर्सूल येथे एक नई पहचान शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रोटे रमेश मेहेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
. कॉर्पोरेट सोशियल रेस्पॉन्सिबिलिटी ( सी एस आर ) अंतर्गत भारतातील नामांकित सिंगर इंडिया कंपनी ने रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांच्या बरोबर सामंजस्य करार करून शिवणकाम प्रशिक्षण देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरु केले आहे ,त्याचा शुभारंभ आज हर्सूल येथील एक नई पहचान या उपक्रमाने झाला. हर्सूल भागातील गरजू पण होतकरू महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वानंदी स्पोर्ट्स व एजुकेशन फौंडेशन यांनी सहकार्य देत या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. या शिवणकाम प्रशिक्षण केंद्रा द्वारे हर्सूल येथील महिलांना शिवणकामा शिवाय फॅशन डिझाईन चे काम शिकविले जाणार आहे .अश्या अतिशय अद्यावत प्रशिक्षणाने या महिलांना स्वयंरोजगार मिळून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होता येणार आहे ज्यामुळे त्यांची समाजामधील प्रतिमा उजळून निघेल आणि एक सन्मानजनक आयुष्य त्या जगू शकतील.
हर्सूल येथे आज ११ शिवण काम यंत्र स्वानंदी स्पोर्ट्स व एजुकेशन फौंडेशन ला सुपूर्द केले गेलेत. सिंगर इंडिया कंपनी ने या मध्ये मोलाचे सहकार्य देत हि शिवण यंत्रे माफक दरात उपलब्ध करून दिली , रोटरी क्लब ऑफ नासिक आणि सिंगर कंपनी यांनी या उपक्रमाचा खर्च समसमान वाटून घेतला आहे. या प्रशिक्षण योजने मध्ये ३ महिन्या चा शिवणकाम सर्टिफिकेट कोर्स दिला जाणार आहे तसेच ६ महिन्या चा शिवणकाम डिप्लोमा कोर्स हि दिला जाणार आहे ज्या मध्ये फॅशन डिझाईन चे काम सुद्धा शिकविले जाणार आहे.१५ वर्षा वरील सर्व मुलींना आणि महिलांना प्रवेश दिला जाणार असून दररोज २ तास लेखी व प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाणार आहे.प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर सिंगर इंडिया कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ नासिक कडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तसेच शिवणयंत्र विकत घेण्यासाठी ५०% सवलत सुद्धा दिली जाणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल श्री रमेश मेहेर यांनी आपल्या उदघाटनपर संभाषणात या प्रोजेक्ट द्वारे रोटरी क्लब महिला सशक्तीकरण ,त्यांचे शैक्षणिक व आर्थिक स्वावलंबन , ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना मिळणे याविषयी मार्गदर्शन केले , तसेच या उपक्रमला कायम स्वरूपी यश्वस्वी रित्या सुरु ठेवण्या साठी येथील महिलांनी जबाबदारी घेऊन हा उपक्रम अविरत सुरु राहील यासाठी कटिबद्ध राहावे असे आव्हान केले आणि यासाठी रोटरी क्लब आपले संपूर्ण सहकार्य देईल याची ग्वाही दिली आणि असे प्रशिक्षण केंद्र अजून अनेक ठिकाणी सुरु करण्याचा मनोदय हि व्यक्त केला. रोटे नीला वाघ व रोटे लक्ष्मण वाघ यांनी यास प्रशिक्षण केंद्रास नियमित देखरेख करण्या साठी वेळ देण्यासाठी आपले सहकार्य असेल असे सांगत त्यांनी रुपये ३०००/- ची स्पॉन्सरशिप देण्याची ग्वाही दिली.रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा रोटे डॉ श्रीया कुलकर्णी , सचिव मंगेश अपशंकर , सचिव ( उपक्रम ) विनायक देवधर , सिंगर प्रोजेक्टचे डिस्ट्रिक्ट ३०३० चेअरमन रवी महादेवकर , सिंगर प्रोजेक्ट रोटरी क्लब ऑफ नासिक चे हेमराज राजपूत , दिलीपसिंग बेनीवाल , डॉ हितेंद्र महाजन , निलेश सोनजे , निलेश अग्रवाल ,उर्मिला देवधर , स्वानंदी स्पोर्ट्स व एजुकेशन फौंडेशन च्या अध्यक्षा सुहासिनी कुलकर्णी , उपाध्यक्ष मीनल जोशी या सर्वानी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.