कोतूळ येथील वसंत महादेव गिते यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील रहिवाशी व मुंबईत विक्रोळी येथे वास्तव्यास असणारे वसंत महादेव गिते( वय 75 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले 20 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी श्री दत्त सेवा केली दत्त सेवक म्हूणन ते परिचित होते परमपूज्य स्वामी डी के दास महाराज यांचे ते शिष्य होते
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे
कोतुळ येथील कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोतुळ या संस्थेचे संस्थापक डॉ.भाऊसाहेब नाना गीते यांचे ते चुलते तर संस्थेच्या सदस्यां सौं मीना गिते यांचे सासरे, संस्थेचे सचिव सुमित गिते यांचे ते आजोबा होते
येथील केंद्रीय निवासी आश्रम शाळा कोतुळ व फोपसंडी शाहू फुले आंबेडकर माध्यमिक निवासी आश्रमशाळा कोतुळ यांचे वतीने मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली

