कोतुळ सोसायटीच्या वार्षिक सभेत गदारोळ, संस्थेतील गैर व्यवहाराचा गाजावाजा !

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ आदिवासी सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज संस्थेतील आर्थिक गैरव्यवराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला या गदारोळातच सभेचे कामकाज आटोपते घेण्यात आले
कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कोतुळ येथील इंद्रप्रस्थ लॉन्स मध्ये संस्थेचे चेअरमन विशाल नामदेव गोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली संस्थेचे सचिव नवनाथ चौधरी यांनी संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे वाचन करणे केले
संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या विषयावरून सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर सभेच्या कामकाजाला गालबोट लागले
कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील 12 लाख 5 हजार 500 रुपयांचा कथित गैर व्यवहाराची रक्कम संचालक व कर्मचाऱ्यांकडून आठ टक्के व्याजदराने वसूल करण्यात यावी असे आदेश सहाय्यक निबंधक यांनी दिले आहेत
कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत आर्थिक वर्ष 25- 26 यामध्ये सुमारे 12 लाख 5 हजार 500 रुपये चा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका प्राधिकृत चौकशी अधिकारी श्री बाबासाहेब पगारे यांनी तपासणीत ठेवला आहे सदर रक्कम दिनांक 25/ 9 / 2025 पासून आठ टक्के सरळ व्याजाने वसूल करण्यात यावे असे आदेश सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांनी दिले आहे
संस्थेतील गैरव्यवहाराची रक्कम संचालक व कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे यावर सभासदांनी प्रश्न विचारले असता गोंधळ निर्माण झाला सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांत खडा जंगी झाली या वातावरणातच सभेचे कामकाज उरकन्यात आले विरोधी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख व सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख समर्थक व सत्ताधारी अगस्ती कारखान्याचे संचालक व संस्थेचे माजी चेअरमन मनोज देशमुख समर्थक अशा दोन गटांमध्ये जोरदार खडा जंगी पाहायला मिळाली दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोपं प्रत्या रोप करण्यात येत होते यावेळी सयाजीराव देशमुख, भाऊसाहेब देशमुख, भीमराज देशमुख, रमेश देशमुख बाळासाहेब देशमुख, सयाजीराव पोखरकर, संस्थेचे चेअरमन विशाल गोडे,व्हाईस चेअरमन निवृत्ती पोखरकर, संचालक मनोज देशमुख, रघुनाथ जाधव, सयाजी देशमुख, संदीप लेंभे, बाळासाहेब लेंभे,भागा शेळके, चंदन वायळ, भीमराव साळवे, बाळासाहेब बेळे,सौ सुनंदा बांबळे, उषा गोडे, चंदू पवार,बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब पोखरकर, अमोल देशमुख, राजेंद्र देशमुख, आदीं सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते


