सार्वजनिक गणेशोत्सवात अकोल्यात २६ जणांना प्रवेशबंदी!
अकोले प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोले तालुक्यातील २६ जणांवर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. १३ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी ही प्रवेश बंदी लागू राहणार आहे
भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या प्रस्तावावरून अप्पर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर यांनी हा आदेश काढला आहे
अकोले व राजूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी १३
जणांचा कारवाईत समावेश आहे. अकोले पोलिस ठाणे हद्दीतील अक्षय मारुती वाकचौरे, रोहिदास भाऊसाहेब उघडे, कचरू किसन बनके, रामदास संतू मोहिते, सिद्धार्थ
रमेश चिकणे, उत्तम आनंदा शिंदे, अनिस बाबू पटेल व नंदलाल प्रभाकर गोडसे यांच्यासह १३ जणांवर आदेश
लागू करण्यात आला आहे.
राजूर पोलिस ठाणे हद्दीतील विक्रम अशोक घाटकर, आकाश दिलीप पावबाके, नवनाथ सुरेश देशमुख,
सुनील लक्ष्मण देशमुख, किसन सुरेश चोथवे, रोहिदास पुता बांडे, भगवान रामचंद्र मुर्तडक, गोरक्षनाथ अशोक अवसरकर, संतोष हिरामन घाणे, किसन सोना बांडे, अरुण पांडुरंग साळवे, काळू विठ्ठल भांगरे व खंडू भाऊ भांगरे यांच्यावरही प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे.
=======


