दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी:-
काकनेवाडी गावातील अत्यंत महत्वाचा असणारा गाव ते वडशेत रस्त्यावर खड्डे, गाळ झाडांच्या फांदया, असल्यामुळे दळणवळणात मोठी अडचण तयार झाली आहे. गावातील बरीच मोठी लोकवस्ती वडशेताच्या बाजूस आहे. येणे जाणे, दैनंदिन व्यवहार करणे ही कठीण झाले आहे. तिखोल चा तलाव याच बाजूला असल्यामुळे शेतकऱयांना तलावावर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
शेतात पिकवलेला माल बाजारपेठे पर्यंत घेऊन जाणे रस्त्याच्या समस्या मुळे कठीण झाले आहे.याआगोदर रोजगार हमी मधून हा रस्ता झाला होता परंतु वर्षभरात च परिस्थिती जैसे थे झाली आहे. बांधकाम समिती अध्यक्ष मा काशिनाथ दाते सर यांनी हा रस्ता दिल्याचे सांगितले होते पन स्थानिक राजकारणात हा रस्ता होऊ शकला नाही.
लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशी मागणी रहिवाशी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
नवरात्री च्या काळात भाविक भक्तांना येण्याजाण्यासाठी आई मुक्ताई चा रस्ता आणि गाव ते वडशेत रस्ता हा होणे खुप गरजेचे आहे
-सचिन शिवाजी वाळुंज (ग्रा. प सदस्य काकनेवाडी )