मनःशांती व आत्मिक विकासासाठी ध्यानधारणा आवश्यक – प्रो.मंजुश्री राठी

नाशिक प्रतिनिधी
“आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच स्पर्धात्मक वातावरणात मनातील अस्वस्थता कमी होण्यासाठी,मनाची, एकाग्रता वाढविण्यासाठी व भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. त्यामुळे नकारात्मक विचारांवर मात करून सकारात्मक विचारात वाढ करणे व त्याद्वारे मनःशांती मिळवून आत्मिक विकास साधणे शक्य आहे,असे उद्गार एम. ई.होलेस्टिक सेंटरच्या संस्थापक प्रो.मंजुश्री राठी यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित ‘ध्यानधारणेचे महत्त्व ‘ या विषयावर त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख होत्या. सदरचा कार्यक्रम रोटरी शेतकरी बाजार, उद्धवजी संग्रहालय, आकाशवाणी केंद्राजवळ संपन्न झाला.
ध्यानधारणा म्हणजे काय, मन,श्वास, ध्यान आणि ऊर्जा यामध्ये कोणता संबंध आहे, ध्यान धारणेचे सोपे सूत्र कोणते, सकारात्मक विचारांचा व्यक्तीच्या मनावर व उर्जेवर सकारात्मक परिणाम कसा होतो या संबंधी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थित श्रोत्यांकडून त्यांनी पंधरा मिनिटांचे प्रात्यक्षिक करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत दळवी यांनी तर आभार प्रदर्शन हेमराज राजपूत यांनी केले.
कार्यक्रमाला रवी महादेवकर, सुचिता महादेवकर , ऋषिकेश सम्मनवार, अनिल कापरेकर, हेमंत राजपूत, मंगेश अपशंकर,स्मिता अपशंकर राज तलरेजा व सतीश मंडोरा तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्राहक उपस्थित होते.

