
राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वारंघूशी येथे आमदार किरण लहामटे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन पार पडले
आमदार किरण लहामटे यांच्यारूपाने अकोले तालुक्यात परिवर्तन घडवून आले आणि या तालुक्यातील विकासाला गतीच मिळाली वारंघूशी गावात सभामंडपासाठी या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच कोणी निधी दिला नाही तो निधी मी दिला वारंघूशी गावच्या विकासासाठी लागणारा निधी मी कमी पडू देणार नाही गावाची मागणी असेल तेव्हढी कामे मी माझ्या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असे आमदार डॉ किरण लहामटे यांनी सांगितले
त्यांचे हस्ते मान्हेरे ते वाकी फाटा रस्ता डांबरीकरण करणे( 50 लक्ष ,) वारंघूशी येथे सभामंडप बांधणे (20 लक्ष रु) बारी येथे बापदेव मंदिरापुढे सभामंडप करणे (20 लक्ष) राज्य मार्ग ते बारी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (35 लक्ष रु) राज्य मार्ग ते पेंडशेत रस्त्यावर छोट्या पुलाचे उदघाटन (60 लक्ष) मुरशेत राजवाडा रस्ता डांबरीकरण करणे – (१०० लक्ष)उडदावणे जिल्हा परिषद शाळा कमान लोकार्पण घाटघर येथे घाटनदेवी रस्ता डांबरीकरण करणे -( ७० लक्ष)कोलटेंभे ते नेकलेस फॉल रस्ता डांबरीकरण करणे -( ७० लक्ष)कोलटेंभे येथे पुलाचे बांधकाम करणे -( ८० लक्ष)टेकाडवाडी येथे पुलाचे बांधकाम करणे -( ७० लक्ष)मुतखेल ते टेकाडवाडी रस्ता डांबरीकरण करणे – (९० लक्ष)
या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार किरणजी लाहमटे यांच्या हस्ते संपन्न झाला

यावेळी संतोष बोटे,संदीप वाळे,रामा मुतडक,सखाराम गांगड, कुशाबा गांगड, भिमराव गिर्हे, देविदास खडके, लक्ष्मण पोकळे, एकनाथ गांगड, एकनाथ खडके, देविदास पोकळे, चंदर गांगड, अंकुश वैद्य, अविनाश कानवडे सर्व गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी कार्यकर्ते, आधिकरी वर्ग, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.-
