मेहंदुरी येथील रस्त्या साठी ग्रामपंचायत सदस्य बसणार …. उपोषणाला

अकोले प्रतिनिधी :-
अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील आदिवासी उपाययोजने अंतर्गत मेहेंदुरी गावासाठी विद्यमान आमदार डॉ किरणजी लहमटे यांनी गावच्या मागणी वरून मेहेंदुरी शिवारातील म्हाळादेवी रस्ता ते पलाटवाडी रस्त्यासाठी पंधरा लक्ष रुपये निधी वर्ग केला असून एक वर्षा पूर्वीच रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.त्या नंतर काम देखील सुरू झाले.पहिल्या टप्प्यात मुरुमीकरण व खडीकरण करून या कामात पाच लक्ष चैतीस हजार रुपये खर्च देखील झाले व त्याचे मूल्यमापन करून ठेकेदाराला पैसे देखील आदा केले.परंतु पुढील काम करायचे तर त्याच वेळी ठेकेदाराने काम सोडून निघून गेला.परंतु हे काम जेव्हा ऑनलाइन झाले.त्याच वेळी ठेकेदाराने अर्धवट काम टाकत सोडून दिले.पण आजही हे काम अर्धवट पडले आहे .अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी पद भर स्वीकारल्या नंतर विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू केले.आणि निधी ही मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील गावांना मोठ्या प्रमाणावर दिला.परंतु जर अश्या पध्दतीने हे कामे दोन वर्षात देखील होणार नसतील तर अर्ध्यावर राहिलेल्या कामांचा राहिलेला निधी मार्च अखेर पर्यंत आता परत गेला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले.दुसऱ्या टप्यातल्या कामाचे ऑनलाईन टेंडर खुले देखील झाले.परंतु ते काम कोणी घेऊन सुरू करत नाही.त्याच मुळे सदर कामाचे पैसे पडून ह्या मार्च अखेर पर्यँत काम पूर्ण झाले नाही तर राहिलेले पैसे परत करावे लागणार यात तीळ मात्र शंका नाही.त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ कानवडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सदर काम सुरू करावे असे पत्र देऊन त्यात असे म्हंटले आहे की,गेली 2 वर्ष झाले काम अर्धवट राहिलेले आहे.ग्रामपंचायत कडे वेळोवेळी मागणी करून देखील काम पूर्ण करण्यात समर्थ दिसत नाही.ग्रामपंचायत ने नव्याने टेंडर टाकून ते खुले करून जवळपास 2 महिने उलटून गेले आहे तरी कोणी काम करताना दिसत नाही.सदर काम अपूर्ण असल्यामुळे नवीन कामासाठी आम्हाला निधीची मागणी करण्यात मोठ्या अडचणी येत आहे.त्या मुळे डॉ कानवडे व बंगाळ यांनी मंगळवार १ फेब्रुवारी पर्यंत या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर नाईलाजाने ग्रामपंचायत कार्यलाया समोर मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.