इतर

मराठी भाषा महाराष्ट्राची लोकभाषा व मातृभाषा -प्रा. हनुमंत माने


संगमनेर – संगमनेर साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रा.हनुमंत माने( बारामती ) यांचे “मराठी असे अमुची मायबोली” या विषयावर व्यापारी असोसिएशन हॉल, संगमनेर येथे व्याख्यान आयोजित केले होते.
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक लेखक, साहित्यिक आप आपल्या परीने योगदान देत असतात. मराठी भाषेला कालही वैभवाचे दिवस होते, आजही आहे आणि भविष्यातही रहाणार आहे.
टी. व्ही. नावाचा ईडीएट बॉक्स आमच्या घरामध्ये आला आणि घरामधील स्वास्थ्य बिघडलं. आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती बिघडवून टाकली. प्रसार माध्यमांनी जे खरं दाखवायला पाहिजे ते दाखवलं जात नाही असे माझे मत आहे. चांगले दाखवायला आमच्याकडे वेळ नाही. जे दाखवायला नकोय त्यासाठी आमच्याकडे वेळ आहे असे त्यांनी नमूद केले.
मोबाईलमुळे आम्ही सारे व्हाट्सअप हिरो झालो, वाचक झालो आणि श्रोते झालो त्यामुळे आम्ही संकुचित झालो. त्यामुळे विचार प्रगल्भता संपली असे मला वाटते. आमच्या संतांनी मराठी साहित्य लिहून ठेवले आहे. संतांनी आजरामर साहित्य निर्माण करून ठेवले आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा जगाला समृद्ध असा ग्रंथ दिलेला आहे त्याची आपण प्रत्येकाने पारायणे केली पाहिजे. जगामधून लोक ज्ञानेश्वरीवर पी. एच. डी. तसेच संशोधन करायला येतात. हे संत साहित्य जनमानासापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या कडून सातत्याने प्रयत्न होतांना दिसतो.
आचर, विचार, कल्पना आणि भावना यांचा सुरेख मेळ जर कुठे बसत असेल तर तो मराठी साहित्यामध्ये बसत असेल असे मला वाटते. आपल्या मराठी माणसामध्ये मध्ये मराठी भाषा संस्कारांची भाषा आहे असे मला वाटते.
वारकरी संप्रदयामधील जे अनुयायी, भक्त आहेत हे सर्व कोणत्याही निरोपाविना पंढरपूर, आळंदीच्या वारीला नियमित जात असतात. आपल्याला दररोज चार कि. मी. चालायचे होत नाही. परंतू हे वारकरी सतत चालत रहातात. काय उर्जा आहे. काय विचार आहे. दरवर्षी आपण याचा अनुभव घेतोय. हे भारतीय संस्कृतीचे आदर्श उदाहरण आहे. तसेच परदेशात ही याचे कौतूक आहे. यामध्ये वयाचा, विद्वत्तेचा व जातीचा लवलेश नसतो. एकाच विचाराने रामकृष्ण हारीचा जयघोष करत पुढे पुढे जात असतात.


ज्याची सहन करायची क्षमता आहे त्याला देवत्व प्राप्त होते. देव घरामध्ये देवाची मुर्ती घडविण्यासाठी दगडाला छणीचे हातोडे सहन करावे लागतात. जो जास्त हातोडे सहन करतो त्याची मुर्ती तयार होऊन देवघरामध्ये विराजमान होते. व जो छनीचे हातोडे कमी सहन करतो त्याची देवळाच्या पायरीसाठी स्थापना होते.
८४ लाख योनींचा फेरा पर्ण करून मनुष्य जन्म मिळतो. मनुष्य जन्म हा सरळ सोपा नाहीहे. आई आपल्याला अनंत यातना सहन करून जन्म देते. तिचा यामधून पुनर्जन्म होत असतो हे आपण विसरता कामा नये. त्याप्रमाणे मराठी भाषेचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यासाठी मराठी भाषा जगली पाहिजे, वाढवली पाहिजे व तिचा उत्कर्ष झाला पाहिजे असे मला वाटते.
आपली जी प्रॉपर्टी आहे ती आपली मुले आहेत. तुम्ही जर तुमची प्रॉपर्टी तुम्ही कमावलेल्या पैशाने काय निर्माण केले यावर जर मोजत असाल तर माझ्या दृष्टीने तुम्ही करंटे आहात असे मी समजतो.
मराठी भाषा ही आमची संस्कृती आहे, ही आमची मायबोली आहे. इंग्रजी भाषाचे आमच्या वरती खूप मोठे आक्रमण झालेय. आम्हाला कोणत्याही भाषेबद्दल रोष नाही हे. आपण सर्व भाषा शिकल्या पाहिजे. ज्या भाषेमुळे माझ्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवितो ती भाषा आपण शिकली पाहिजे असे मला वाटते.
आपण इंग्रजी भाषा शिकून परदेशामध्ये नोकरी करिता जातो. तेथे आपण नोकरी करतो. परंतु आपण मराठी भाषेला विसरून जातो. याचे मला वाईट वाटते.
आपल्याला उत्तम वाचन करता आले पाहिजे. तसेच आपल्याला उत्तम लेखनही करता आले पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाचे काय असेल तर आपण श्रवण करण्याचे शिकले पाहिजे.
ज्ञान गृहाच्या दोन पायऱ्या आहेत. डोळे आणि कान या दोन इंद्रीयांचा वापर जास्त करावा लागणार आहे. कानाने ऐकावे व डोळ्याने पहायचे, ७०% काम तुम्ही पर्ण पणे आत्मसात करू शकता. उरलेले ३०% पैकी १०% मॅटर, उरलेले २०%काम आहे ते प्रेझेंटेशन सादर करणे आहे. याच बरोबर आपण भाषण कौशल्य प्राप्त करावे. जो कृत्यांमध्ये उत्तम तो जगात उत्तम हे आपल्याला नाकारून चालणार नाही.
सुरेश परदेशी सरांनी महाराष्ट्र गौरव गीत गाऊन वातावरण मराठीमय केले. प्रास्ताविक बाळकृष्ण महाजन सरांनी केले. पाहुण्यांचा परीचय शशांक गंधे सरांनी करून दिला.
अतिथीचा सत्कार परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी केला. डॉ. सुधाकर पेटकर यांचा विशेष सन्मान हनुमंत माने यांनी केला. सुत्रसंचालन अनिल सोमणी साहेबांनी केले.
ज्ञानेश्वर राक्षे साहेबांनी सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास संगमनेर साहित्य परिषदेमधील सर्व अधिकारी, पदाधिकारी व सदस्य हजर होते. संगमनेरकर रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमनेर साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button