इतर

राजूर येथे कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम संपन्न

भाऊसाहेब वाकचौरे

रुंभोडी प्रतिनिधी

राजूर येथे अकोले तालुका विधी सेवा समिती व अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला

अकोले न्यायालयाच्या अंतर्गत नेहमीच वेगवेगळी कायदे कानून ची शिबिरे आयोजित केली जातात याचाच एक भाग म्हणून राजूर येथे आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात अकोले तालुका विधि सेवा समिती व अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी राईट ऑफ सीनियर सिटीजन आणि मायनर फॉर फिमेल वेल्फेर स्कीम नालासा व आदिवासी भागात नालासा संदर्भातले कायदे कानून या संदर्भातले मार्गदर्शन अकोले न्यायालयाचे न्यायाधीश श्री डी एम हिंग्लजकर दिवाणी न्यायाधीश अकोले एडवोकेट मंगल हांडे,राजुर चे दिवाणी न्यायाधीश सचिन न्याहारकर, अकोल्याचे सह दिवाणी न्यायाधीश श्री अनंत टेंगसे, प्रकल्प अधिकारी सौ डी पी बोकडे मॅडम यांनी उपस्थित आदिवासी महिला अंगणवाडी सेविका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले

प्रास्तविक एडवोकेट आर डी नवले यांनी केले तर आभार वकील संघाचे सचिव ज्ञानेश्वर काकड यांनी मानले सूत्रसंचालन एडवोकेट निगळे यांनी केले कार्यक्रमास मच्छिंद्र मंडलिक पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे दत्तात्रय शंकर राम रुद्रे उपस्थित होते
——-=====——

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button