अकोल्यात दिव्यांग विद्यार्थी शिबिराला चांगला प्रतिसाद

अकोले प्रतिनिधी
आज दिनांक- 02/10/2026 रोजी समावेशीत शिक्षण विभाग, पंचायत समिती अकोले आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने मोजमाप शिबिर (अलिम्को) आयोजित करण्यात आले.दिव्यांग विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांग जनशक्तीकरण विभाग नवी दिल्ली आणि यांची स्वायत्त असलेली संस्था अलिम्को,जबलपूर यांच्या पथकामार्फत ADIP-SSA समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन 2026-27 करिता हे अलिम्को शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. अकोले तालुक्यातील सर्व केंद्रांतुन 280+ दिव्यांग विद्यार्थी शिबिरासाठी उपस्थित होते.
सदर शिबिरासाठी उपस्थित असलेल्या P&O(ऑर्थोपेडिक) तज्ञ डॉ. संकेत देरवणकर, EDP तज्ञ वीरेंद्र राठोड व Fabricating तज्ञ कुणाल सिंग हे डॉक्टर शिबिरासाठी लाभले. सदर अलिम्को शिबिर हे अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दीपक धुमाळ यांच्या नेतृत्वामध्ये पार पाडण्यात आले. सदर अलिम्को शिबिराचे सनियंत्रण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गट समन्वयक सविता कचरे यांनी केले. सदर शिबिरास शालेय पोषण आहार अधीक्षक बाळासाहेब दोरगे,विस्तार अधिकारी राजेश पावसे,अरविंद कुमावत,संभाजी झावरे,अनिल गायकवाड,ज्ञानेश्वर माळवे,जनार्दन भवरे,सुरेखा फापाळे तसेच केंद्र समन्वयक स्वाती अडाणे व सर्व केंद्र समन्वयक यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले तसेच जिल्हा समन्वयक श्रद्धा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक राहुल देशमुख, किशोर खेमनर,संदीप कडवे यांनी अलिम्को टीमचे स्वागत केले व शिबिरातील पालक-विद्यार्थी बैठक व्यवस्था करून आवश्यक समुपदेशन मार्गदर्शन केले

.महेश काळे, रंजना कराळे, सीमा कानवडे, महेश मोहिते यांनी सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांची उपस्थिती पत्रक भरून आवश्यक कागदपत्र जमा करून घेतले.कैलास झोळेकर, दत्ता क्षीरसागर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे PART-A फॉर्म भरून घेतले. तसेच ज्ञानेश्वर शेंडगे,विठ्ठल धांडे, दीपक भांगरे, संकेत देशमुख यांनी अलिम्को डॉक्टर पथकाबरोबर रेफर झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन पालक विद्यार्थ्यांना मदत केली.सारिका गडाख व मनीषा झोळेकर काळजीवाहक यांनी शिबिरामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी पालकांचे फॉर्म भरून घेतले व शिबीर स्थळी आवश्यक मदत केली. तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे ऑडिओग्राम काढण्यासाठी तोरकडी सर व NRHM टीमचे डॉ संदीप कडलग व टीम यांनीही आवश्यक सहकार्य केले. तसेच केशव भांगरे यांचे आवश्यक तांत्रिक सहाय्य लाभले.

सदर शिबिरास उपस्थित सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांच्यासाठी अल्पोआहार व चहा ची व्यवस्था स्वाती अडाणे,केंद्रसमन्वयक विठे यांच्या मार्फत करण्यात आली.
शिबिरासाठी आवश्यक वर्गखोल्या, लाईट, पिण्याचे पाण्याची व्यवस्था अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय शिंदे, उपमुख्याध्यापक संदीप दारोळे, शिरीष नाईकवाडी यांनी केले. उपस्थित सर्वांच्या सहकार्याने तालुक्यातील अलिम्को शिबिरास मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी- पालक उपस्थित ठेऊन शिबिर यशस्वी केले.
दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी, आवश्यक साधनांसाठी कागदपत्रांची पूर्तता आणि पालकांना मार्गदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक सहाय्यक साहित्य-साधने उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला या शिबिरामुळे अधिक गती मिळाली.
दीपक धुमाळ
(गटशिक्षणाधीकरी,पंचायत समिती अकोले)



