इतर

आंतरभारती श्रीरामपूर शाखेतर्फे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

संजय उकिरडे /प्रतिनिधी
श्रीरामपूर – येथील आंतरभारती श्रीरामपूर शाखेतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे मातापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयराव पा. थोरात होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी.ई. शेळके, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, प्राचार्य डॉ. प्रकाश देशमुख, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष लेविन भोसले, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्राचार्य सुभाष लिंगायत, सौ. शोभाताई लिंगायत आदी उपस्थित होते. महात्मा गांधी, साने गुरुजी, स्व. खासदार गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विजयराव पा. थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, आमची शाळा म्हणजे ग्रामीण भागातील शेतशिवारातील ज्ञानगंगा आहे. आदिक परिवाराने ग्रामीण शिक्षणाचा ध्यास घेतला आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श शाळा जपत आहे, म्हणून शाळेच्या प्रांगणात मोठे वडाचे झाड डौलाने आम्हाला प्रेरणा देते. रयत शिक्षण संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, ज्येष्ठ प्रशासकीय सेवक, साहित्यिक येथे उपस्थित आहेत, सर्व गुरुवर्यांचे आगमन हा आमच्यासाठी आशीर्वाद आहे. शाळेतील सर्व कर्मचारी टीम अत्यंत प्रामाणिक, शिस्तबद्ध असल्यानेच शाळा प्रगतीपथावर आहे. या शाळेची अधिक प्रगती होण्यासाठी सर्वांनी हातभार लावला तर संगणक कक्ष आणि इतर सुविधा करणे सोपे होईल, असे सांगून सर्व मान्यवरांचा त्यांनी सत्कार केला.

संयोजक प्राचार्य सुभाष लिंगायत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये परीक्षकांतर्फे मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्राचार्य शेळके, सुखदेव सुकळे, प्राचार्य डॉ. देशमुख, लेविन भोसले, दत्तात्रय रायपल्ली यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. शाळेतील शिक्षक अरविंद थोरात, किशोर तुपे, राहूल पुंड, शिरीष सोमवंशी, ज्योती दुशिंग, प्रतिभा तागड, , वैशाली चोळके, साक्षी उंडे आदिंनी कार्यक्रम नियोजनात भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. संगीता फासाटे यांनी केले तर संगीता गायके यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button