कु.साक्षी रविंद्र ताजने हिची शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय MBBS साठी निवड !

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत-केळी ओतूर येथे कार्यरत असलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे अहमदनगर जिल्हा संघटक श्री.रविंद्र ताजणे व प्राथमिक शिक्षिका सौ.सुनीता ताजण-पावटे मॅडम यांची सुकन्या कु.साक्षी ताजने हिची सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बीएस साठी निवड झाली आहे.
कु साक्षी ताजने हिच्या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तिचे माध्यमिक शिक्षण प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल येथे पूर्ण केले व 94 टक्के गुण मिळवून इयत्ता दहावी मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला होता,तसेच उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे पूर्ण केले व 87%गुण मिळवून इयत्ता बारावीत महाविद्यालयात तिने प्रथम क्रमांक पटकावला होता.यावर्षी नीट मध्ये 565 गुण मिळाल्याने तिची शासकीय कोटयातून MBBS साठी निवड झालीआहे.भविष्यात हृदय रोग तज्ञ म्हणून रुग्णांची सेवा करण्याचा तिचा मानस आहे.या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.